सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी बालकाच्या वयाबाबात प्राथमिक शिक्षण संचालकांचे पत्र.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत परिपत्रक पुढील प्रमाणे.
प्रति,
श्रीमती आदिती एकबोटे
वरिष्ठ तांत्रिक संचालक,
एनआयसी पुणे.
विषय :- सन २०२४- २५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्रमांकः- आरटीई २०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०.
२. शासन निर्णय क्रमंक:- आरटीई २०१९/प्र.क्र. ११९ / एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९.
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
👉👉नर्सरी मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत बालकाचे वय तीन वर्षे पूर्ण असावे.
👉👉ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाची वय 31 डिसेंबर 2024 पर्यंत चार वर्ष पूर्ण असावे.
👉👉सिनियर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत पाच वर्षे पूर्ण असावे.
👉👉याचाच अर्थ वर्ग पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे.