भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना – विशेष मोहीम.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
4 Min Read

    मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर,जालना बीड,हिंगोली,परभणी,लातूर,नांदेड आणि धाडसी या जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यातून एक शाळा याप्रमाणे 76 शाळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेमध्ये समाविष्ट होणार आहेत.


मराठवाडा मुक्ती संग्राम सुवर्ण महोत्सव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना विशेष मोहीम.

   दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेले घोषणा.

       सन 2021-22 पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भौतिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे (लहान बांधकामे व मोठी बांधकामे) याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना राबविण्यात येत आहे.सदर योजनेचा पहिला टप्पा सध्या कार्यरत असून त्यात 478 शाळांचा समावेश आहे.

⏭️. विषयांकित मंत्रिमंडळ बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने संदर्भात खालील प्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे.

1. मराठवाडा मुक्ती संग्रामात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या व मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा लौकिक प्राप्त असलेल्या वीरांगणा स्व. श्रीमती दगडाबाई शेळके यांचे यथोचित स्मारक त्यांच्या मूळ गावी म्हणजे मौजे धोपटेश्वर ता. बदनापुर जि. जालना येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात उभारण्यात येईल व सदर शाळेचा समावेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत करून विविध विकास कामासाठी रुपये 5 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

2. शासनाच्या अभिलेखात ज्याची ज्यांची मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी म्हणून नोंद आहे त्यांच्या मूळ गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत समाविष्ट करावयाची आहे.या अनुषंगाने मराठवाड्यातील 76 तालुक्यातून विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रत्येकी एक शाळेची निवड करून प्रत्येक शाळेत रुपये 1.25 कोटी व एकूण रुपये 95 कोटी इतका निधी विविध सुविधांचे निर्माण व संसाधनांची उपलब्धता व निश्चित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

⏭️ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळा निवडण्याची साठी निश्चित करण्यात आलेले निकष खालील प्रमाणे आहेत.

1. किमान पहिली ते सातवी ची शाळा.

2. किमान पटसंख्या 100

3. शाळेचे मध्यवर्ती स्थान व उत्तम रोड कनेक्टिव्हिटी

4. वाढत्या पटसंख्येच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्ग खोल्या बांधकामासाठी पुरेशा जागेची उपलब्धता.

5. क्रीडांगणासाठी पुरेशी जागा.

⏭️ उपरोक्त पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्याची आपणास विनंती आहे.

1. स्वर्गवासी दगडाबाई शेळके यांची यथूचित स्मारक मौजे धोपटेश्वर ता. बदनापुर जि. जालना येथील जि.प.शाळेच्या प्रांगणात उभारण्याचा व सदर शाळेचा समावेश आदर्श शाळा योजनेत करण्याबाबतचा प्रस्ताव अंदाजपत्रकास व इतर आवश्यक तपशिलासह संबंधितांकडून मागविण्यात यावा. असा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अंदाजपत्रकाची छाननी करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांना देण्यात याव्यात.

2. शासन अभिलेखात ज्यांची मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वतंत्र सेनानी म्हणून नोंद आहे अशा मराठवाड्यातील सर्व तालुक्यातील सेनानींच्या मूळ गावातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व शाळांची यादी सोबत जोडलेल्या नमुन्यात शासनात सत्वर सादर करण्यात यावी.एखाद्या तालुक्यात विहित निकषांची पूर्तता करणारी स्वतंत्र सेनानीच्या मूळ गावातील एकही शाळा नसल्यास एक किंवा सर्व निकष शिथिल करून त्या शाळेचा तपशील देखील सादर करण्यात यावा.

                            श्री.शरद माकणे 

                   कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन

सदरील योजनेचा तपशील खालील पीडीएफ मध्ये आपणास मिळून येईल त्याचबरोबर ज्या फॉरमॅटमध्ये शाळेची माहिती द्यायची आहे तो फॉर्मेट सुद्धा आपणास खालील पीडीएफ मध्ये मिळून येईल.


Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *