विद्यार्थ्यांची उपस्थिती आता ऑनलाईन होणार. Attendence Bot ( चाटबॉट) वर उपस्थिती नोंदविण्याबाबत मार्गदर्शन.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
4 Min Read

    


  शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते ,शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागात भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम/योजना आखण्यास मदत व्हावी,याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK)कार्यान्वित करण्यात आले आहे.

      सदर विद्या समीक्षा केंद्र पुणे मार्फत सदर Attendence(चाटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेली आहे.त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदान शाळेतील इयत्ता  १ली ते १० वीच्या इयतेतील विद्यार्थी उपस्थिती Swiftchat या Application मधील Attendence Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दिनांक १ डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.

   तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना या Attendence Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे तसेच सदर उपस्थिती नियमित नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा.

                           प्रदीप कुमार डांगे (भाप्रसे)

                              राज्य प्रकल्प संचालक

                                 म.प्रा. शि.प्र. मुंबई



विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती – मार्गदर्शक सूचना

1. गुगल प्ले स्टोअर वरून Swiftchat हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे.

2. प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार Swiftchat या Application मधील Attendence Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

3. उपस्थित नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आयडी चा वापर करावा.

4. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

5. सद्यस्थितीत जिल्हा परिषद,नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय.डी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendence Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल सेवार्थ व इतर प्रणालीतील वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendence Bot (चाटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

6. एखाद्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांची तुकडी विनाअनुदानित असेल,तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ आय.डी द्वारे नोंदविण्यात येईल.

7. काही शिक्षकांना Attendence Bot (चाटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय.डी मध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकांच्या शालार्थ आय.डी चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

8. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल,सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टल मधील माहिती अपडेट करावी सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

9. या Attendence Bot (चाटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी.

10. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) समग्र शिक्षा ही विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती Attendence Bot वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

11. ऑनलाइन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी 

https://tinyurl.com/AttendanceBot

या लिंकवर सदर कराव्या.

आमच्या WhatsApp ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/CuVyQkQUNEr8CqwdRwo146

सदरील निर्णय खाली दिलेल्या लिंकमधून तुम्ही डाऊनलोड करू शकता.


Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *