Teacher transfer!आंतरजिल्हा बदली
दिनांक एक नोव्हेंबर 2023 पासून आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार ग्राम विकास विभागाचे आदेश.
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया एक नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्याचे आदेश ऑनलाईन शिक्षक बदली करणाऱ्या विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले आहेत.
1. वरील पत्रानुसार 13-9-2023 च्या शासन निर्णयान्वये ज्या शिक्षकांनी 2022 च्या आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी अर्ज केले होते परंतु रिक्त जागा अभावी ज्या शिक्षकांची बदली झाली नव्हती अशा 2022 च्या प्रतिक्षाधिन प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे बदली करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
2. शालेय शिक्षण विभागाने 21-06-2023 च्या शासन निर्णयान्वये सन 2022 मध्ये ज्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेले होते परंतु बदली पाहिजे असलेल्या जिल्ह्यांमध्ये रक्त जागा नसल्यामुळे बदली मिळाली नाही अशा शिक्षकांचे अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली देण्यात यावी असे सांगितले आहे.
दिनांक 27 ऑक्टोबर चे श्री पो. द.देशमुख (उपसचिव महाराष्ट्र शासन) यांचे पत्र.