कारणे दाखवा नोटीस
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..
संदर्भ :- १. केंद्रशासनाचे दि. ३०.०४.२०२४ रोजीच्या आढावा बैठकीतील निर्देश.
२. संचालनालयाने आयोजित केलेल्या विभाग निहाय आढावा बैठका
३. संचालनालयाचे निर्देश पत्र क्र. ०३२५४ दि. २३.०४.२०२४.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.
9. pmposhan-mis.education.gov.in
२. education.maharashtra.gov.in
उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.
अ. Annual Data Entry
आ. Monthly Data Entry
इ. MDM daily attendance
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम. आय. एस पोर्टलवर Annual Data Entry
बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्याच्या
सुचना देण्यात आलेल्या होत्या, तथापि सोबत जोडण्यात आलेल्या माहितीनुसार अद्यापही अनेक जिल्ह्यांनी सदरचे
Annual Data Entry चे काम गांभीर्याने घेत नसलेबाबत निदर्शनास येत आहे.
याव्यतिरिक्त माहे एप्रिल, २०२४ महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा मे
महिन्याच्या दि. ०५ पर्यंत अद्यावत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते. तथापि सोबत जोडण्यात आलेल्या
माहितीनुसार अद्यापही अनेक जिल्ह्यांनी सदरचे Monthly mis Data Entry चे काम गांभीर्याने घेत नसलेबाबत
निदर्शनास येत आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देश देण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry
monthly mis data entry अद्यापही पूर्ण न होण्याच्या कारणासह आपला स्वयंस्पष्ट खुलासा, सदरची माहिती पूर्ण
करुन संचालनालयास दि. १३.०५.२०२४ पर्यंत सादर करावा, अन्यथा सर्व संबंधितांविरोधात उचित कारवाईचा
प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रत माहितीस्तव सादर : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry बाबत.
Leave a comment