📋 वाचाल तर वाचाल 📋
आज दिनांक :- ०२ जुलै २०२४
आज वार:- मंगळवार
सुविचार :- शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
🛑 दिनविशेष.
📌 महत्त्वाच्या घटना
▶️२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
▶️१९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
▶️१९७२ : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.
▶️१९४० : सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
🛑 जन्मदिवस / जयंती★*~
➡️१९३० : कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
➡️१९२५ : पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
➡️१९२३ : जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी
➡️१८८० : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
🛑 मृत्यू / पुण्यतिथी
👉२०११ : चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते
👉१९६१ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली
👉१९५० : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
👉१८४३ : डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
🛑 प्रश्नावली 🛑
प्रश्न १. शतपत्रे कोणी लिहिली ?
उत्तर :- गोपाळ हरी देशमुख.(लोकहितवादी)
प्रश्न २. जीवनसत्व ब – १२ ला काय म्हणतात ?
उत्तर :- सायनोकोबाॅलामीन.
प्रश्न ३. जाट रेजिमिंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
उत्तर :- संघटन व वीरता.
प्रश्न ४ भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
उत्तर :- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
प्रश्न ५. नेताजी हे संबोधन कोणाला लावले जाते ?
उत्तर :- सुभाषचंद्र बोस.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
*महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्वाच्या योजना .*
❇️ कर्नाटक राज्य
गृहलक्ष्मी योजना : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी
❇️ तमिळनाडू राज्य
कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये
❇️ आंध्र प्रदेश राज्य :
अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये
❇️ उत्तर प्रदेश राज्य
कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये
❇️ मध्य प्रदेश राज्य
लाडली बहना योजना : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये
❇️ पश्चिम बंगाल
लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये
कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये
रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान
❇️ महाराष्ट्र
◾️ लेक लाडकी योजना
🔥मुलीचा जन्म झाल्यावर : 5 हजार रुपये
🔥मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर : 6 हजार रुपये
🔥मुलगी सहावीत गेल्यावर: 7 हजार रुपये
🔥मुलगी 11 वीत गेल्यावर: 8 हजार रुपये
🔥मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: 75 हजार रुपये
◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
👱♀️ कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.
👱♀️ महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते.