विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर) दक्षिण पश्चिम)
शिक्षणाधिकारी प्राथमिक (सर्व जिल्हे)
प्रशासन अधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)
विषयः- “शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत… दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४
संदर्भ :-
१) उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २२८/एस. डी. ४. दिनांक-१२ जुलै, २०२४ २) मा. प्रधान सचिव, यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. बैठक-२०२४/प्र.क. १६६/एस. डी. ४. दिनांक-१६ जुलै, २०२४
सोबत जोडलेल्या पत्राचे अवलोकन व्हावे.
उपरोक्त विषयाबायत संदर्भ क्र. १ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण भोरण-२०२० व्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
संदर्भ क्र. २ च्या पत्रशत नमूद केल्याप्रमाणे शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राचविणेबाबत सूचित केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. तरी उपरोक्त प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात.
सहपत्र- वरीलप्रमाणे
(शरद गासावी)
शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१