प्रति,
1) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
2) शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद सर्व.
3) शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी,
महानगरपालिका सर्व.
विषय : दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत.
संदर्भ : 1) सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र
क्र.D.O.No.02.05/2024-IS.14, दि.09/07/2024.
2) मा. उपसचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-2024/प्र.क्र.228/
एस.डी.4, दि.12/07/2024.
3) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडील पत्र क्र.शिआ/2024/
संकीर्ण/आस्था क- माध्य/2024/4391 दि.16/07/2024.
4) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडील पत्र
क्र.रा.शै.सं.प्र.प.म./NEP/ शिक्षा सप्ताह/2024-25/03455 दि.16/07/2024.
5) संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे पत्र क्र.प्राशिसं/802/ संकीर्ण/शिक्षण सप्ताह/4944 दि.19/07/2024.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. संदर्भिय पत्र क्र. ३, ४ व ५ अन्वये शिक्षण सप्ताहामध्ये संदर्भिय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार प्रतीदिन उपक्रम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच सदर शिक्षण सप्ताहादरम्यान दिन निहाय आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
उपरोक्त पत्रांन्वये शिक्षण सप्ताहच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत शाळांमध्ये साजरा करण्यात आलेल्या शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे, माहिती https://shikshasaptah.com/shiksha-saptah या लिंकवर अपलोड करण्यात यावी.
(संजय डोर्लीकर)
उपसंचालक (प्रकल्प/प्रशासन)
म.प्रा.शि.प.,मुंबई
प्रत माहितीस्तव सविनय सादर,
1) मा. आयुक्त महानगरपालिका (सर्व).
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व.
प्रत माहितीस्तव व उचित कार्यवाहीस्तव :
1) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व.
2) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / योजना), जिल्हा परिषद सर्व.
3) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व.
सदरील पत्र PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.