“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी “. प्रश्नावली १४४

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

                     📖 वाचाल तर वाचाल 📖

              📘 परिपाठ 📘


🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका

✒️✒️आज दिनांक :-   २७ जुलै २०२४

🔊🔊आजचा वार:- शनिवार

📙📘सुविचार :- चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमचा पूर्ण दिवस आनंददायी बनवते.


📙📘📙 दिनविशेष.

🌍आजचा जागतिक दिन :
जागतिक दिन :
CRPF स्थापना दिवस
27 जुलै दिनविशेष – घटना
1663 : ब्रिटीश संसदेने एक कायदा संमत केला ज्याने अमेरिकेसाठी बंधनकारक असलेल्या सर्व वस्तू इंग्रजी जहाजांमधून इंग्रजी बंदरांमधून पाठवणे बंधनकारक केले.
1761 : माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले.
1866 : व्हॅलेन्सिया बेट, आयर्लंड ते ट्रिनिटी बे, कॅनडापर्यंत समुद्राखालील केबल पूर्ण झाली. युरोप आणि अमेरिका यांच्यात टेलिग्राफिक संदेश पाठवणे शक्य झाले.
1890 : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी स्वतःवर गोळी झाडली. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
1921 : टोरंटो विद्यापीठाचे सर फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना शुद्ध स्वरूपात इन्सुलिन वेगळे करण्यात यश आले.
1939 : CRPF अस्तित्वात आले.
1940 : अ वाइल्ड हेअर या ॲनिमेटेड शॉर्ट फिल्ममध्ये बग्स बनी हे पात्र दिसले.
1949 : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
1955 : मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रियामधून आपले सैन्य मागे घेतले.
1976 : जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
1990 : बेलारूसने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
1997 : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
1999 : द्रपेट्रोलियम मंत्रालयाने लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
2001 : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारतींमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
2012 : लंडनमध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

दिनविशेष – जन्म :
1667 : ‘योहान बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1748)
1899 : ‘पर्सी हॉर्नी ब्रूक’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1911 : ‘डॉ. पां. वा. सुखात्मे’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1997)
1915 : ‘जॅक आयव्हरसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1940: ‘भारती मुखर्जी’ – भारतीय- अमेरिकन लेखिका यांचा जन्म.
1954 : ‘जी.एस. बाली’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
1955 : ‘अ‍ॅलन बॉर्डर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
1960 : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ – महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
1963 : ‘नवेद अंजुम’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1967 : ‘राहुल बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म.
1983 : ‘सॉकर वेल्हो’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.

दिनविशेष – मृत्यू :
1844 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 सप्टेंबर 1766)
1895 : ‘उस्ताद बंदे अली खाँ बीनकार’ – किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादक यांचे निधन.
1975 : ‘मामासाहेब देवगिरीकर’ – गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले यांचे निधन.
1980 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1919)
1992 : ‘अमजद खान’ – हिन्दी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1940 – गझनी, अफगाणिस्तान)
1997 : ‘बळवंत लक्ष्मण वष्ट’ – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांचे निधन.
2002 : ‘कृष्णकांत’ – भारताचे 10वे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1927)
2007 : ‘वामन दत्तात्रय पटवर्धन’ – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1917)
2015 : ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम’ – भारताचे 11 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1931)

🌍🌍  जागतिक दिन लेख :
       
           केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिवस
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), 27 जुलै रोजी आपला स्थापना दिवस असतो. हा दिवस राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी दलाच्या अफाट आणि अतुलनीय योगदानाचा उत्सव साजरा करतो. CRPF हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली कार्य करते.

आपल्या स्थापना दिनी, CRPF आपल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतात. परेड, पुष्पहार अर्पण समारंभ आणि रक्तदान शिबिर यासह या प्रसंगी अनेक कार्यक्रमांचे आयोजनही फोर्स करते.
              

🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया

                     📋 म्हणी व अर्थ 📋

👉 आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वत:च्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे .
                     ✒️ वाक्प्रचार ✒️

👉 अरेरावी करणे – मग्रुरीने वागणे

         ✒️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द ✒️

👉 महिन्याने प्रसिद्ध होणारे :- मासिक

🕐 बोधकथा.

                      गरज सरो आणि वैद्य मरो
    वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले.

              जागे झाले तोवर ऊन उतरल होत. उठून बसले. एकाच लक्ष वर झाडाकडे गेल म्हणू लागला “अरे,केवढं मोठं आहे हे झाड पण काय कामाचं? ना फूल ना फळ. अगदी निरुपयोगी आहे हे.”दुसऱ्यांने त्याचीच री ओढली. म्हणाला, “असलं झाड कोणा मूर्खाने लावलं कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीचा आहे हे.”त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला त्याची पान जोरात सळसळू लागली. झाड म्हणाल, “मुर्खांनो,एन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात मी थंडगार सावली दिली. ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय? मी नसतो तर तुमचं काय झालं असतं?”
  प्रवासी वरमले त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला.

तात्पर्यः आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही.
                       
📘 दिनांकानुसार पाढा :- २७ चा पाढा

                                  २७           १६२
                                  ५४           १८९
                                  ८१           २१६
                                  १०८         २४३
                                  १३५         २७०

📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📖📋📋📖📋📖📋📖📋📖

          📝प्रश्नावली १४४ 📝

प्रश्न १. महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारी लागवडीचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे
उत्तर :- सोलापूर

प्रश्न २. महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे झाले ?
उत्तर : पुणे

प्रश्न ३. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर :- इचलकरंजी

प्रश्न ४. भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता ?
उत्तर :- अरवली पर्वत.

प्रश्न ५. महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर :- नायगाव ( बीड )

📙📙📙📙📙📙🕐🕐🕐🕐🕐🕐📙📙📙📙📙📙

👉 आपल्या माहितीसाठी.

🌏 भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

◾️31 ऑक्टोबर 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनाकायदा, 2019 च्या परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले.

◾️26 जानेवारी 2020 रोजी,दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले

🛑 केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची माहिती 👇

✅ क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा : लडाख : 59,143 Km2

✅ क्षेत्रफळानुसार सर्वात लहान : लक्षद्वीप 32 Km2

✅ लोकसंख्या सर्वात जास्त : दिल्ली 16,787,941

✅ लोकसंख्या सर्वात कमी : लक्षद्वीप 64,473

🛑 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी

◾️जम्मू काश्मीर ला 2 राजधानी आहेत
👉श्रीनगर – उन्हाळा
👉जम्मू – हिवाळा

◾️लडाख ला 2 राजधानी आहेत
👉लेह – उन्हाळा
👉कारगिल – हिवाळा

◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव – दमण
◾️चंदीगड – चंदीगड
◾️दिल्ली – नवी दिल्ली
◾️पुद्दुचेरी – पँडेचरी
◾️लक्षद्वीप – करवट्टी
◾️अंदमान आणि निकोबार बेटे – पोर्ट ब्लेअर.

🙏अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या ब्लॉग ल भेट द्या🙏

    



   

Share This Article