“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १४५.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

                   📖 वाचाल तर वाचाल 📖

         📘📙परिपाठ 📙📘


🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका

✒️✒️आज दिनांक :-   २९ जुलै २०२४

🔊🔊आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :- माणसाचा सर्वांगीण विकास घडविते तेच खरी शिक्षण.


📙📘📙 दिनविशेष.

🌍आजचा जागतिक दिन :
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
पावसाचा दिवस
आजचा दिनविशेष – घटना :
1852 : जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
1876 : फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
1920 : अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली.
1921 : ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला.
1946 : टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.
1948 : 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले.
1957 : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना.
1985 : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1987 : भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली.
1997 : हरनाम घोष कोलकाता, स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला.
2021 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.

आजचा दिनविशेष – जन्म :
1838 : ‘शाहजहान बेगम’ – भोपाळच्या नवाब बेगम यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1901)
1883 : ‘बेनिटो मुसोलिनी’ – इटलीचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1945)
1898 : ‘इसिदोरआयझॅक राबी’ – नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1904 : ‘जे. आर. डी. टाटा’ – भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म.  (मृत्यू : 29 नोव्हेंबर 1993)
1922 : ‘ब. मो. पुरंदरे’ – लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म.
1925 : ‘शि. द. फडणीस’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म.
1937 : ‘डॅनियेल मॅकफॅडेन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1953 : ‘अनुप जलोटा’ – भजन गायक यांचा जन्म.
1954 : ‘हर्षद मेहता’ – भारतीय स्टॉक ब्रोकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म.
1959 : ‘संजय दत्त’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
1981 : ‘फर्नांडो अलोन्सो’ – स्पॅनिश फोर्मुला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म

आजचा दिनविशेष – मृत्यू :
238 : 238ई.पुर्व  : ‘बाल्बिनस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
1108 : ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 23 मे 1052)
1891 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचे निधन.
1781 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1713)
1890 : ‘व्हिन्सेंटव्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1853)
1891 : ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ – बंगाली समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1820)
1900 : ‘उंबेर्तो पहिला’ – इटलीचा राजा यांचे निधन.
1987 : ‘बिभूतीभूशन मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1894)
1994 : ‘डोरोथीक्रोफूट हॉजकिन’ – नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
1996 : ‘अरुणा असफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1909)
2002 : ‘सुधीर फडके’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जुलै 1919)
2003 : ‘जॉनी वॉकर’ – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1926)
2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1928)
2009 : ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचे निधन. (जन्म : 23 मे 1919)
2013 : ‘मुनीर हुसेन’ – भारतीय क्रिकेटरपटू यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1929)

🌍🌍  जागतिक दिन लेख :
       
                      आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
जगभरातील लोकांना व्याघ्र संवर्धनासाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची निर्मिती करण्यात आली आहे. या दिवसाचे उद्दिष्ट जगव्यापी प्रणालीला चालना देण्यासाठी मदत करणे हा आहे ज्याद्वारे आम्ही वाघ आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहोत.

व्याघ्र संवर्धनाच्या मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी देखील आपण या दिवसाचा उपयोग करू शकतो. शेवटी, जेव्हा अधिक लोकांना एखाद्या गोष्टीची जाणीव होते, तेव्हा ते मदतीसाठी अधिक प्रवृत्त असतात आणि म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

जगभरातील वाघांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वाघांना नामशेष होण्याच्या जवळ नेणारे अनेक उपचार आहेत आणि आम्ही हे अविश्वसनीय प्राणी गमावणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करू शकतो. वाघांना भेडसावणाऱ्या काही धोक्यांमध्ये शिकार करणे, मानवांशी संघर्ष आणि अधिवास नष्ट होणे यांचा समावेश होतो.   

            
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया

                     📋 म्हणी व अर्थ 📋

👉       पुढच्या स्टेज मागचा शहाणा – दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे.

               ✒️ वाक्प्रचार ✒️

👉 धाडस करणे – धैर्य दाखवणे हिंमत करणे

         ✒️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द ✒️

👉 कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग

🕐 बोधकथा.

                               दोन  मुलं  आणि दुकानदार
दोन तरुण मुल एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून,
त्यापैकीएकाने एक लाडू चोरला आणि तो दुसऱ्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला.
लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला,
देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’ ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो,
‘मीही शपथ घेऊन सांगतो की,मी काही तुमचा लाडू चोरला नाही. दुकानदार म्हणाला, ‘तुम्हादोघापैकी
कोणी लाडू चोरला,हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकीएक असामी चोर असून, तुम्ही दोघेही
लबाड आहात,‘तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडूचोरला होता,
तो म्हणतो, ‘हे मी अगदी खात्रीने सांगतो.’
‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य – लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे
                       
📘 दिनांकानुसार पाढा :- २९ चा पाढा

                                  २९           १७४
                                  ५८           २०३
                                  ८७           २३२
                                  ११६         २६१
                                  १४५         २९०

   📘📙📘📙📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📘📙📘📙📘

          🛑प्रश्नावली १४५🛑

प्रश्न १. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाहिले पदक मिळविणारी खेळाडू कोण ?
उत्तर :-  मीनू भाकर [नेमबाजी(१० मीटर पिस्टोल)]

प्रश्न २. 2024 चा लोकमान्य टिळक  राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर :  सुधा मूर्ती.

प्रश्न ३. महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- सी.पी.राधाकृष्णन.

प्रश्न ४.राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
उत्तर :- २९ ऑगस्ट – मेजर ध्यानचंद यांची जयंती.

प्रश्न ५. महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून कोणता मासा घोषित करण्यात आला ?
उत्तर :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट ).

📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖

आपल्या माहितीसाठी.

आपल्या माहितीसाठी
*भारतीय महिला ऑलिम्पिक विजेत्या: सर्व पदके.*
*◾️कर्णम मल्लेश्वरी 🏋‍♀*
⭐️कांस्य पदक
⭐️वेटलिफ्टिंग (महिला 54 किलो)
⭐️सिडनी ऑलम्पिक 2000
*◾️सायना नेहवाल 🏸*
⭐️कांस्य पदक
⭐️बॅडमिंटन (महिला एकेरी)
⭐️लंडन ऑलम्पिक 2012
*◾️मेरी कोम 🥊*
⭐️कांस्य पदक
⭐️बॉक्सिंग (महिला)
⭐️लंडन ऑलम्पिक 2012
*◾️पीव्ही सिंधू🏸*
⭐️सिल्व्हर पदक
⭐️बॅडमिंटन (महिला एकेरी)
⭐️रिओ ऑलम्पिक 2016
*◾️साक्षी मलिक 🤼‍♀*
⭐️कांस्य पदक
⭐️कुस्ती (महिला 58 किलो)
⭐️रिओ ऑलम्पिक 2016
*◾️मीराबाई चानू🏋*
⭐️सिल्व्हर पदक
⭐️वेटलिफ्टिंग (महिला 49 किलो)व
⭐️ टोकियो ऑलम्पिक 2020
*◾️लोव्हलिना बोरगोहेन 🥊*
⭐️कांस्य पदक
⭐️बॉक्सिंग (महिला वेल्टरवेट)
⭐️टोकियो ऑलम्पिक 2020
*◾️पीव्ही सिंधू🏸*
⭐️कांस्य पदक
⭐️बॅडमिंटन (महिला एकेरी)
⭐️टोकियो ऑलम्पिक 2020

Share This Article