📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 परिपाठ 📙
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- ३० जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- मनुष्य हा गुण आणि दोष यांचे मिश्रण आहे.
📙📘📙 दिनविशेष.
🌍आजचा जागतिक दिन :
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस
✒️📖 आजचा दिनविशेष – घटना :
762 : 762ई.पुर्व : खलीफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
1629 : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप झाला आणि सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
1898 : विल्यम केलॉगने कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
1930 : पहिला विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
1945 – दुसरे महायुद्ध : जपानी पाणबुडी I-58 ने यूएसएस इंडियानापोलिस बुडवले आणि 883 नाविकांचा मृत्यू झाला. विमानाने वाचलेल्यांना लक्षात येईपर्यंत पुढील चार दिवसांत बहुतेकांचा मृत्यू होतो.
1962 : ट्रान्स कॅनडा महामार्ग, जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, सुमारे 8,030 किमी खुला झाला.
1971 : अपोलो 15 चंद्रावर उतरले.
1997 : राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना जाहीर.
2000 : चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
2001 : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2014 : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू.
2020 : नासाच्या मंगळ 2020 मोहिमेचे केप कॅनवेरल एअर फोर्स स्टेशनवरून ॲटलस V रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले.
✒️📖 आजचा दिनविशेष – जन्म :
1818 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1848)
1855 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1919)
1863 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 1947)
1947 : ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर’ – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38वे राज्यपाल यांचा जन्म.
1951 : ‘गॅरी यहूदा’ – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार यांचा जन्म.
1973 : ‘सोनू निगम’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
1973 : ‘सोनू सूद’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
1980 : ‘जेम्स अँडरसन’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
✒️📖 आजचा दिनविशेष – मृत्यू :
1622 : ‘संत तुलसीदास’ – यांनी देहत्याग केले.
1718 : ‘विल्यम पेन’ – पेनसिल्व्हेनियाचे स्थापक यांचे निधन.
1898 : ‘ऑटोफोन बिस्मार्क’ – जर्मनीचे पहिले चान्सलर यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1815)
1930 : ‘जोन गॅम्पर’ – बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1877)
1947 : ‘जोसेफ कूक’ – ऑस्ट्रेलियाचे 6वे पंतप्रधान यांचे निधन.
1960 : ‘गंगाधर बाळकृष्ण देशपांडे’ – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 31 मार्च 1871)
1983 : ‘वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक यांचे निधन. (जन्म : 2 मे 1920)
1994 : ‘शंकर पाटील’ – मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1926)
1995 : ‘डॉ. विनायक महादेव दांडेकर’ – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1920)
1997 : ‘बाओडाई’ – व्हिएतनामचा राजा यांचे निधन.
2007 : ‘इंगमार बर्गमन’ – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
2007 : ‘मिकेलांजेलो अँतोनियोनी’ – इटालियन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
2011 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1937)
2013 : ‘बेंजामिन वॉकर’ – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1913)
🌍🌍 जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन सर्व संस्कृतींमध्ये मैत्रीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो. हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, संयुक्त राष्ट्र समुदाय गट, संस्था आणि सरकारांना सलोखा, परस्पर समंजसपणा आणि एकता यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करते.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (U.N.) द्वारे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन नियुक्त केला गेला. सर्व समुदाय आणि संस्थांना आम्ही आमच्या जवळ असलेल्या मैत्रीचा उत्सव साजरा करणाऱ्या कार्यक्रमांचे समन्वय साधण्यासाठी प्रोत्साहित करते. बऱ्याच इव्हेंटमध्ये सलोखा निर्माण करणे, समजूतदारपणा आणि सहमती निर्माण करणे आणि घरासारखे वाटत असलेल्या मैत्रीमध्ये सांत्वन मिळवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.
👉 व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस.
संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले आहे की, प्रत्येक देशात दररोज, मानवी तस्कर नफ्यासाठी लोकांचे शोषण करतात, विशेषत: जे गरीब आणि असुरक्षित आहेत. तस्करी झालेल्या लोकांपैकी 70% पेक्षा जास्त लोक स्त्रिया आणि मुली आहेत आणि जवळजवळ 33% मुले आहेत असे दर्शविणाऱ्या संख्येसह, मानवी तस्करीविरूद्ध लढा आवश्यक आहे.
या दुःखद गुन्ह्याबद्दल आणि मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, प्रतिबंध आणि संरक्षण उपायांमध्ये अधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व्यक्तींच्या तस्करी विरुद्धचा जागतिक दिवस येथे आहे.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
📋 म्हणी व अर्थ 📋
👉हापापाचा माल गापापाला – फुकटचे मिळालेले फुकटच जाते.
✒️ वाक्प्रचार ✒️
👉 हातभार लावणे :- सहकार्य करणे.
✒️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द ✒️
👉 उपकारांची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न.
🕐 बोधकथा.
✒️उपयोगी जीवन ✒️
एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला याविषयी आपापसात बोलू लागले.
त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला,’अरे बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार !’ तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, ‘बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे.
मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?
तात्पर्य :-
खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.!
📘 दिनांकानुसार पाढा :- २९ चा पाढा
३० १८०
६० २१०
९० २४०
१२० २७०
१५० ३००
📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📘📙
🛑 प्रश्नावली १४६ 🛑
प्रश्न १.भारताचे आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर :- सरदार पटेल.
प्रश्न २ : सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ?
उत्तर :- रत्नागिरी
प्रश्न ३. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते ?
उत्तर :- खडकवासला
प्रश्न ४. भारतातील पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे ?
उत्तर :- इंदिरा गांधी
प्रश्न ५. इंदौर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते ?
उत्तर :- मल्हारराव होळकर
प्रश्न ६. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- गुजरात
प्रश्न ७. माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
उत्तर :- अण्णा हजारे
प्रश्न ८. ऋतुजा बक्षी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर :- बुद्धिबळ
प्रश्न ९. जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर :-१० जानेवारी
प्रश्न १० : ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर :- साहित्य क्षेत्र
📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘
👉 आपल्या माहितीसाठी.
महत्वाच्या संस्था – स्थापना मुख्यालय
✔️ BIMSTEC – ( Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation
◾️स्थापना : 6 जून 1997
◾️मुख्यालय : ढाका – बांगलादेश
✔️ ASEAN – Association Of South East Asian Nation’s
▪️स्थापना : 8 ऑगस्ट 1967
▪️मुख्यालय : जकर्ता – इंडोनेशिया
✔️ ICJ – ( international Court of Justice)
◾️स्थापना : 1945
◾️मुख्यालय : हेग – नेदरलँड
✔️ NATO – (North Atlantic Treaty Organization)
▪️स्थापना : 4 एप्रिल 1949
▪️मुख्यालय : ब्रुसेल्स – बेल्जियम
✔️ IMF(International Monetary Fund
▪️स्थापना : 27 डिसेंबर 1945
▪️मुख्यालय : वॉशिंग्टन डीसी – अमेरिका
✔️ ADB (Asian Development Bank)
◾️स्थापना : 19 डिसेंबर 1966
◾️मुख्यालय : फिलिपिन्स
✔️WHO ( World Health Organisation )
◾️स्थापना : 7 एप्रिल 1948
◾️मुख्यालय : जीनेव्ह – स्वित्झर्लंड
✔️UNICEF (United Nation’s children’s Fund)
▪️स्थापना : 11 डिसेंबर 1946
▪️मुख्यालय : न्यूयॉर्क – अमेरिका
✔️ SCO – (Shanghai Cooperation Organization )
◾️स्थापना : 15 जून 2001
◾️मुख्यालय : बीजिंग – चीन
✔️SAARC (South Asian Association for Regional Cooperation )
▪️स्थापना 8 डिसेंबर 1985
▪️मुख्यालय: काठमांडू – नेपाळ
✔️UNSCO (United Nations Educational Scientific and cultural Organization)
◾️स्थापना : 16 नोव्हेंबर 1945
◾️मुख्यालय : पॅरिस फ्रान्स
✔️ FIFA ( Federation International de Football Association)
▪️स्थापना : 21 मे 1904
▪️मुख्यालय : झुरिच – स्विझर्लंड
✔️ICC ( international Cricket Council)
◾️ स्थापना 15 जून 1909
◾️ मुख्यालय : दुबई (UAE)