“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १४७. prashnavali 147.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
11 Min Read

                    📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘📙 परिपाठ 📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-   ३१ जुलै २०२४

🔊🔊आजचा वार:- बुधवार

📙📘सुविचार :- संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,पण संकटाचा सामना करणं,त्याच्या हातात असतं.

📙📘📙 दिनविशेष.

🌍आजचा जागतिक दिन
जागतिक रेंजर दिन


✒️📖 आजचा दिनविशेष – घटना
👉1498 : ख्रिस्तोफर कोलंबस हा पश्चिम गोलार्धातील तिसऱ्या प्रवासादरम्यान त्रिनिदाद बेटांचा शोध घेणारा पहिला युटोपियन बनला.
👉1657 : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
👉1658 : औरंगजेब मुघल सम्राट झाला.
👉1856 : न्यूझीलंडची राजधानी क्राइस्ट चर्चची स्थापना.
👉1937 : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
👉1948 : न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले.
👉1951 : जपान एरलाइन्सची स्थापना झाली.
👉1954 : के-2 (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले.
👉1956 : जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
👉1964 : रेंजर 7 अंतराळयानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली.
👉1992 : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
👉1992 : सातारचे वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
👉2000 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
👉2001 : डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार संचालक प्रदान.
👉2012 : मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.

✒️📖 आजचा दिनविशेष – जन्म

➡️1704 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1752)
➡️1800 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1882)
➡️1872 : ‘लक्ष्मणरामचंद्र पांगारकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1941)
➡️1880 : ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1936)
➡️1886 : ‘फ्रेड क्विम्बे’ – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1965)
➡️1902 : ‘के. शंकर पिल्ले’  व्यंगचित्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1989)
➡️1907 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 1966)
➡️1912 : ‘मिल्टन फ्रिडमन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 2006)
➡️1918 : ‘डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर’ – संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 2000)
➡️1919 : ‘हेमू अधिकारी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
➡️1941 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)
➡️1947 : ‘मुमताज’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
➡️1954 : ‘मनिवंनान’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2013)
➡️1965 : ‘जे. के. रोलिंग’ – हॅरी पॉटर च्या लेखिका यांचा जन्म.
➡️1992 : ‘श्रेया आढाव’ – आहारतज्ज्ञ यांचा जन्म.
➡️1992 : ‘कियारा अडवाणी’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

✒️📖 आजचा दिनविशेष – मृत्यू :

▶️1805 : ‘धीरान चिन्नमलाई’ – तामिळ सरदार यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1765)
▶️1865 : ‘जगन्नाथ शंकर शेटे’ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1803)
▶️1875 : ‘अँड्रयू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1808)
▶️1940 : ‘उधम सिंग’ – भारतीय कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1899)
▶️1968 : ‘पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1867)
▶️1980 : ‘मोहंमद रफी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1924 – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
▶️2014 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 23 जून 1948)


        🌍🌍  जागतिक दिन लेख 🌍🌍

               ✒️     जागतिक रेंजर दिन  ✒️
      जागतिक रेंजर दिवस लष्करी किंवा क्रीडा नायकांबद्दल नाही. आज, आम्ही पार्क रेंजर्सना श्रद्धांजली वाहतो, ज्यांना फॉरेस्ट रेंजर्स देखील म्हणतात. कमी होत चाललेल्या वाळवंटातील जमीन संसाधनांचे संरक्षण, जतन आणि संरक्षण करणारे हिरो, आणि कर्तव्याच्या ओळीत आपले प्राण गमावलेल्या रेंजर्सचे स्मरण करतो. पार्क रेंजर राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पासची पडताळणी करत आहेत आणि प्रवेश शुल्क गोळा करत आहेत किंवा वन रेंजर वन्यजीवांचा अर्थ लावत आहेत आणि टूरवर अभ्यागतांना नेत असताना संरक्षणावर चर्चा करत आहेत, असे आपल्यापैकी बरेच जण सहजपणे चित्रित करू शकतात. परंतु पार्क रेंजरची कर्तव्ये किती वेळा त्याला किंवा तिला त्यांच्या व्यवसायात अंतर्भूत असलेल्या जीवघेण्या धोक्यांशी सामोरे जातात हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहित आहे.

जागतिक रेंजर दिवस त्यांच्या महत्त्वाच्या कार्याला पाठिंबा देण्याची संधी देते, ज्यात पर्यावरणीय प्रचारापासून ते शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या रेंजर्सना श्रद्धांजली वाहण्याचीही हा दिवस आहे.

असा अंदाज आहे की जगभरात 100,000 पेक्षा जास्त राखीव, उद्याने आणि संरक्षित क्षेत्रे आहेत. जागतिक रेंजर दिन आंतरराष्ट्रीय रेंजर फेडरेशनने तयार केला होता आणि 2007 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता.

        🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉     अंधारात केले , पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येते.

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे .

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 देव आहे असे मानणारा – आस्तिक.

🕐📝 बोधकथा.
                    कष्टाची कमाई
एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.
संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?
चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करून
चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.

तात्‍पर्य :- पापाची कमाई दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.
                     
                       
📘 दिनांकानुसार पाढा :- ३१ चा पाढा

                                  ३१           १८६
                                  ६२           २१७
                                  ९३           २४८
                                  १२४         २७९
                                  १५५         ३१०

    📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖

            🛑 प्रश्नावली 🛑

प्रश्न १.भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो ?
उत्तर :- पणजी

प्रश्न २. जागतिक मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर :- १० डिसेंबर

प्रश्न ३. कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- बिहार

प्रश्न ४.भारतातील कोणत्या शहरा मधील सर्वात जुनी मेट्रो आहे ?
उत्तर :- कोलकाता

प्रश्न ५. मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
उत्तर :-इंफाळ

प्रश्न ६.महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?
उत्तर :-सातारा

प्रश्न ७.महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते  आहे ?
उत्तर :- गंगापूर

प्रश्न ८ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते ?
उत्तर :-क्लोरीन

प्रश्न ९. कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येते कारण कांद्यामधून ……….. वायू बाहेर पडतो ?
उत्तर :-अमोनिया

प्रश्न १०.’ क ‘ जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?
उत्तर :- स्कर्व्ही

📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝

📖 आपल्या माहितीसाठी 📖

💧 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात आला.
◾️2010 पासून व्याघ्र दिन साजरा केला जातो
◾️2010 साली सेंट पीटर्सबर्ग, रशिया समितीमध्ये  29 जुलै तारखेचा निर्णय घेतला
◾️TX2 असे ध्येय ठेवले होते : वाघांची संख्या दुप्पट करणे
◾️वैज्ञानिक नाव : पँथेरा टायग्रीस
◾️प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना केली जाते
◾️जगाच्या 70% वाघ एकट्या भारतात आहेत
◾️टायगर स्टेट : मध्यप्रदेश ला म्हणतात
◾️संपूर्ण देशभरात 2022 व्याघ्रगणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली (2023 -3882 झाली)
❤️ वाघांना वाचवण्यासाठी सरकारने केलेलं प्रयत्न
⭐️1969 : सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी
⭐️1972 : वन्यजीव संवर्धन कायदा
⭐️1973 : प्रोजेक्ट टायगर सुरू
⭐️2010 : जागतिक व्याघ्र दिन सुरवात
⭐️2023 : International Big Cat alliance
🏪⭐️International Big Cat alliance :
☑️प्रोजेक्ट टायगर च्या 50 व्या वर्धापन दिना निमित्त स्थपण
☑️मुख्यालय : भारत
☑️एप्रिल 2023 मध्ये भारताने सुरू केलेली एक मेगा ग्लोबल अलायन्स आहे .
☑️वाघ , सिंह , हिम तेंदुए , बिबट्या , जग्वार , प्यूमा आणि चित्ता यांचा समावेश असलेल्या जगातील सात प्रमुख मोठ्या मांजरींचे संवर्धन
☑️96 सदस्य देश आहेत

⭐️ देशात एकूण 55 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
⭐️55 वा : ढोलपूर – करौली व्याघ्र प्रकल्प (राजयस्थान)
⭐️भारतातील सर्वात मोठा व्याघ्र पकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )
⭐️भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)

❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🐅नवेगाव-नागझिरा ( गोंदिया)
🐅बोर :- (वर्धा)
🐅सह्याद्री :- (सांगली , सातारा ,कोल्हापूर)
🐅मेळघाट :- ( अमरावती)
🐅पेंच व्याघ्र प्रकल्प :-(नागपुर)
🐅ताडोबा-अंधारी :- (चंद्रपूर)

‼️ काही महत्वाचे
➗➗➗➗➗➗
➡️ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
➡️ मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
➡️बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प.

Share This Article