दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत. आजचे पत्र.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत…

प्रति,


प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद (सर्व)

विषयः- दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत…

महोदय/महोदया,

वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे. वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी याप्रकरणी किती कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे.

२. अधिवेशनामध्ये सम्नाननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी “३ महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल” असे नमूद केले आहे.

तरी दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार १५ दिवसात शासनास rdd.est4- mh@mah.gov.in या ईमेलवर सादर करण्यात यावा. सदर प्रकरणी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी कालमर्यादा नमूद केली असल्याने आपले स्तरावर तातडीने कार्यवाही करुन माहिती शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.

                                   आपला
                              (सुभाष इंगळे)
                           उप सचिव, महाराष्ट्र शासन

Share This Article