“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १४८. prashnavali 148.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
14 Min Read

                   📖  वाचाल तर वाचाल 📖

       📙📘परिपाठ 📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-   १ ऑगस्ट २०२४

🔊🔊आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :- केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

📙📘📙 दिनविशेष.

🌍आजचा जागतिक दिन :
जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस
वर्ल्ड वाइड वेब डे

आजचा दिनविशेष – घटना :
👉1461 : एडवर्ड चौथा इंग्लंडच्या सिंहासनावर आरूढ झाला.
👉1774 : जोसेफ प्रिस्टली आणि कार्ल स्कील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन मूलद्रव्य वेगळे केले.
👉1800 : ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे राज्य युनायटेड किंगडममध्ये विलीन झाले.
👉1831 : लंडन ब्रिज वाहतुकीसाठी खुला.
👉1876 : कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
👉1902 : अमेरिकेने पनामा कालवा बांधण्याचे आणि वापरण्याचे अधिकार फ्रान्सकडून विकत घेतले
👉1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
👉1920 : असहकार चळवळ सुरू झाली
👉1944 : पोलंडची राजधानी वॉर्सा येथे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
👉1960 : बेनिनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
👉1960 : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी बनली.
👉1981 : अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
👉1994 : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली.
👉1996 : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते-निर्माते डॉ. दादासाहेब फाळके पुरस्कार राजकुमार यांना जाहीर.
👉2001 : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
👉2008 : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 वर अकरा गिर्यारोहकांचा मृत्यू.
👉2022 : मंकीपॉक्सच्या साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवला गेला.

आजचा दिनविशेष – जन्म :

▶️10 : 10ई.पूर्व : ‘क्लॉडियस’ – रोमन सम्राट यांचा जन्म.
▶️1744 : ‘जीन बाप्टिस्टे’ – लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 1829)
▶️1835 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर – पुणे)
▶️1882 : ‘पुरुषोत्तम दास टंडन’ – भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुलै 1962)
▶️1899 : ‘कमला नेहरू’ – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1936)
▶️1913 : ‘भगवान आबाजी पालव’ – चित्रपट अभिनेते दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2002)
▶️1915 : श्री. ज. जोशी– कथाकार कादंबरीकार यांचा जन्म.
▶️1920 : ‘अण्णाभाऊ साठे’ – लोकशाहीर यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1969)
▶️1924 : ‘सर फ्रँक वॉरेल’ – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1967)
▶️1933 : ‘मीना कुमारी’ – हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, गायिका व कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 1972)
▶️1948 :’एव्ही अराद’– मार्वल स्टुडिओ चे संस्थापक यांचा जन्म.
▶️1952 : ‘यजुर्वेंद्र सिंग’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1955 : ‘अरुण लाल’– क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.
▶️1969 : ‘ग्रॅहॅम थॉर्प’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1987 : ‘तापसी पन्नू’ – भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

➡️1137 : ‘लुई (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1081)
➡️1920 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1856 – रत्‍नागिरी)
➡️1999 : ‘निरादसी चौधरी’ – बंगाली साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1897)
➡️2005 : ‘फहाद’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1921)
➡️2008 : ‘हरकिशनसिंग सुरजित’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1916)
➡️2008 : ‘अशोक मंकड’ – क्रिकेटपटू यांचे निधन.



        🌍🌍  जागतिक दिन लेख 🌍🌍

             जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस

               फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे, जो दरवर्षी स्तन, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या एकत्रित कर्करोगापेक्षा जास्त जीव घेतो. असा अंदाज आहे की फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे जगभरातील पाचपैकी एक कर्करोग मृत्यू होतो. 2012 मध्ये, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 1.8 दशलक्ष नवीन निदान झाले होते.
जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या घटनांवर मात करण्यासाठी, जगभरातील लोक हा अतिशय खास दिवस साजरा करतात. या दिवसाचे मिशन सोपे आहे — फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जास्तीत जास्त जागरुकता वाढवा आणि लोकांना या आजारासाठी स्वतःची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करा. हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे… जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा कर्करोग जगात इतका प्रचलित आहे की दरवर्षी कोलन, स्तन आणि यकृताच्या कर्करोगापेक्षा जास्त लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने मरतात.

                                    व्यक्तीविशेष

✒️ अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे : (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८),चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचापुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

  ✒️  २. लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक, ज्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते, ते भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात एक महत्त्वाचे नेते होते. 1856 मध्ये जन्मलेले ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनले. “भारतीय अशांततेचे जनक” म्हणून ओळखले जाणारे, टिळकांनी आपल्या शक्तिशाली भाषणांनी आणि लेखनाने अनेकांना प्रेरित केले. त्यांचा स्वराज्यावर (स्वराज्य) दृढ विश्वास होता आणि त्यांनी भारतीयांना त्यांच्या संस्कृतीचा आणि वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही त्यांची प्रसिद्ध घोषणा अनेक स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक मोठा आवाज बनली.

प्रारंभिक जीवन
लोकमान्य टिळक यांचा जन्म बाळ गंगाधर टिळक म्हणून 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्र येथे झाला. तो सुशिक्षित कुटुंबातून आला होता; त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक आणि संस्कृत विद्वान होते. टिळकांनी लहानपणापासूनच शिक्षण आणि शिकण्यात आस्था दाखवली.

टिळकांनी त्यांच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवले आणि पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताची पदवी मिळवली. त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक संगोपनाचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. शिक्षण आणि संस्कृतीतील या पायाने त्याच्या भावी विचारधारा आणि कृतींना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर टिळकांनी शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली परंतु लवकरच ते सामाजिक आणि राजकीय कार्याकडे वळले. त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांनी आणि शिक्षणाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची नंतरची भूमिका साकारली.
वृत्तपत्रांची स्थापना
केसरी आणि मराठा: टिळकांनी केसरी (मराठीत) आणि मराठा (इंग्रजीत) ही दोन प्रभावी वृत्तपत्रे स्थापन केली. ही कागदपत्रे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार आणि जनजागरण करण्याचे शक्तिशाली साधन बनले.

टिळकांच्या नेतृत्वाखाली मूलभूत चळवळी
स्वदेशी चळवळ: टिळकांनी स्वदेशी चळवळीला चालना दिली, भारतीयांना ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार घालण्यास आणि भारतीय-निर्मित उत्पादनांचे समर्थन करण्यास प्रोत्साहित केले. या चळवळीचा उद्देश भारतीय उद्योगांना पुनरुज्जीवित करणे आणि ब्रिटिश वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे हे होते.
होमरूल चळवळ: 1916 मध्ये, टिळकांनी ॲनी बेझंटसह भारतासाठी स्वशासनाची मागणी करत होमरूल चळवळ सुरू केली. या चळवळीला व्यापक पाठिंबा मिळाला आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होते.

इतर योगदान
गणेश चतुर्थी आणि शिवाजी सण: टिळकांनी भारतीयांमध्ये एकतेची आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना वाढवण्यासाठी या सणांचे उत्सव लोकप्रिय केले. हे उत्सव राजकीय मेळावे आणि चर्चांचे व्यासपीठ म्हणूनही काम करतात.

शैक्षणिक सुधारणा: टिळकांचा शिक्षणाच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास होता आणि त्यांनी भारतातील शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी कार्य केले. त्यांनी शाळा स्थापन केल्या आणि आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

        🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉     उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? – एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे.

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 उपकारांची जाणिव असणारा – कृतज्ञ

🕐📝 बोधकथा.

            एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.
तात्पर्य- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.

📘 दिनांकानुसार पाढा :- १ चा पाढा

                                  १           ६
                                  २           ७
                                  ३           ८
                                  ४           ९
                                  ५           १०

    📝📖📝📖📝📖📝📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📝📖📝📖📝

         🛑 प्रश्नावली १४८ 🛑

प्रश्न १.’ डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू.

प्रश्न २. ‘ भोपाळ वायू दुर्घटना ‘ कोणत्या वायूमुळे झाली ?
उत्तर :- मिथाईल आईसोसायनाइट.

प्रश्न ३. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे ?
उत्तर :- सातपुडा.

प्रश्न ४. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोण ?
उत्तर :- सचिन तेंडुलकर.

प्रश्न ५. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?
उत्तर :- श्रीहरीकोटा.

📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝📖📝

आपल्या माहितीसाठी.

चलनी नोटा व त्यावरील चिन्ह.

🚔 500   च्या नोटवर ➖ लाल किल्ला
🚔 200   च्या नोटवर ➖ सांची स्तूप
🚔 100   च्या नोटवर ➖ राणीची बाग
🚔 50     च्या नोटवर ➖ हंपीचा रथ
🚔 20     च्या नोटवर ➖ वेरूळच्या गुफा
🚔 10     च्या नोटवर ➖ कोणार्क सूर्य मंदीर

Share This Article