📖 वाचाल तर वाचाल 📖
📘परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २१ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️आंतरराष्ट्रीय शांतता दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
➡️1792 : अठराव्या लुई चे साम्राज्य संपुष्टात आले आणि फ्रेंच प्रजासत्ताकचा जन्म झाला.
➡️1939 : रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
➡️1942 : दुसरे महायुद्ध – नाझींनी युक्रेनमध्ये 2,800 ज्यूंची हत्या केली.
➡️1964 : माल्टा युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
➡️1965 : गांबिया, मालदीव आणि सिंगापूर संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
➡️1968 : रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली.
➡️1971 : बहरीन, भूतान आणि कतार संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
➡️1972 : फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू.
➡️1976 : सेशेल्स संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
➡️1981 : बेलीझला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
➡️1984 : ब्रुनेई संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
➡️1991 : आर्मेनियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले
➡️2003 : गॅलिलिओ अंतराळयान गुरूच्या वातावरणात पाठवून संपुष्टात आले.
➡️2011 : ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या 16 जनुकांचा शोध घेण्यात यश मिळविले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1866 : ‘एच. जी. वेल्स’ – विज्ञान कथा इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1946)
▶️1895 : ‘हरी सिंग’ – भारतातील जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा शेवटचा शासक महाराजा यांचा जन्म.
▶️1902 : ‘ऍलन लेन’ – पेंग्विन बुक्स चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जुलै 1970)
▶️1909 : ‘घवानी एनक्रमाह’ – घाना देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1972)
▶️1929 : ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ – शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1998)
▶️1939 : ‘अग्निवेश’ – भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी यांचा जन्म.
▶️1944 : ‘राजा मुजफ्फर अली’ – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
▶️1963 : ‘कर्टली अँब्रोस’ – वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
▶️1979 : ‘ख्रिस गेल’ – वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
▶️1980 : ‘करीना कपूर’ – अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1743 : ‘सवाई जयसिंग’ – जयपूर संस्थानचे राजे यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1688)
👉1982 : ‘सदानंद रेगे’ – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 21 जून 1923)
👉1992 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म : 10 मे 1914)
👉1998 : ‘फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर’ – अमेरिकेची धावपटू यांचे निधन. (जन्म : 21 डिसेंबर 1959)
👉2012 : ‘गोपालन कस्तुरी’ – पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1924)
🌍✒️ जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय शांतता दिन
आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील शांतता, अहिंसा आणि एकात्मतेसाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1981 साली हा दिवस शांततेच्या महत्त्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केला होता. युद्ध, संघर्ष आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी लोक एकत्र येऊन शांततेच्या विचारांचे समर्थन करतात.शांततेचा प्रसार, संवाद आणि समन्वय वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रम, चर्चासत्रे आणि कार्यक्रम योजले जातात. या दिवसाचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानवजातीने एकमेकांशी संवाद साधून आणि मतभेद सोडवून शांततेच्या दिशेने पावले उचलणे.
या दिवसाच्या निमित्ताने, लोक एकत्र येऊन समाजातील हिंसेचे निर्मूलन कसे करता येईल, यावर चर्चा करतात आणि शांततेच्या दिशेने कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतात.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 नाणी पाडण्याचा कारखाना – टाकसाळ
🙏 प्रार्थना 🙏
ऐ मालिक तेरे बन्दे हम,ऐसे हों हमारे करम
नेकी पर चले और बदी से ले, ताकी हँसते हुए निकले दम.
ऐ मालिक तेरे बंदे हम…….
ये अंधेरा घना छा रहा, तेरा इंसान घबरा रहा।
हो रहा बेख़बर, कुछ ना आता नज़र,
सुख का सूरज छिपा जा रहा।
है तेरी रोशनी में जो दम, वो अमावस को कर दे पूनम।
नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……….
बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों हैं इस में कमी।
पर तू जो खड़ा, है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी।
दिया तूने हमें जब जनम, तू ही ले लेगा हम सब के ग़म।
नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……..
जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना।
वो बुराई करें, हम भलाई करे, न ही बदले की हो भावना।
बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिठे बैर का ये भरम।
नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुये निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम…. ..
📝 बोधकथा 📝
बगळा व लांडगा
एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, ‘तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?’
तात्पर्य – दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.
📘 दिनांकानुसार पाढा :- २१ चा पाढा
२१ १२६
४२ १४७
६३ १६८
८४ १८९
१०५ २१०
🌍🌍🌍🌍🕐🕐🕐🕐🌍🌍🌍🌍🕐🕐🕐🕐🌍🌍🌍🌍🕐🕐🕐🕐
📝 प्रश्नावली १८४ 📝
प्रश्न १. दूरदर्शनचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : जॉन लॉगी बेयर्ड
प्रश्न २. भारताची पहिली महिला शासक कोण होती?
उत्तर : रझिया सुलतान
प्रश्न ३. मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
प्रश्न ४. ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा कोणी दिली?
उत्तर : भगतसिंग
प्रश्न ५. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाले?
उत्तर : १३ एप्रिल १९१९,अमृतसर ( पंजाब )
📙📙📘📘📙📙📘📘📙📙📘📘📙📙📘📘📙📙📘📘📙📙📘📘
👉आपल्या माहितीसाठी.
भारतातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे
🏰 सुवर्ण मंदिर……………….अमृतसर
🏜 लाल किल्ला………………दिल्ली
🕋 जामा मस्जिद……………..दिल्ली
🗼 कुतुबमीनार……………….दिल्ली
🏛 राष्ट्रपती भवन……………..दिल्ली
⛩ इंडिया गेट………………….दिल्ली
🕌 ताजमहाल…………………आग्रा
🛕 मीनाक्षी मंदिर………………मदुराई
☀️ सुर्य मंदिर…………………..कोणार्क
🐋 तारापोरवाला मत्स्यालय……मुंबई
⚓️ गेटवे ऑफ इंडिया…………..मुंबई
🎍हैंगीग गार्डन………………….मुंबई
🎄राणीचा बाग………………….मुंबई
🏟 गोल घुमट…………………..विजापूर
♻️ त्रिवेणी संगम………………अलाहाबाद
🚪 बुलंद दरवाजा……………..फत्तेपूर सिक्री
🕍 हवा महल…………………..जयपूर
🚩 विजयस्तंभ…………………चितोड
🌊 जोग धबधबा……………….म्हैसूर
🌉 हावडा ब्रीज……………….कोलकाता
🙏 पसायदान 🙏
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||