📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २३ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
➡️1803 : दुसरे अँग्लो-मराठा युद्ध: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अष्टाची लढाई.
➡️1846 : अर्बेन ले व्हेरिअरने नेपच्यून ग्रह शोधला, गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह आहे.
➡️1884 : महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली
➡️1905 : नॉर्वे आणि स्वीडन, पूर्वी एकत्र, कार्लस्टॅडच्या कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
➡️1908 : कॅनडामध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली.
➡️1932 : हेजाझ आणि नेजदच्या राज्याला सौदी अरेबियाचे राज्य असे नाव देण्यात आले.
➡️1983 : सेंट किट्स आणि नेव्हिस संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
➡️2002 : Mozilla Firefox ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1861 : ‘रॉबर्ट बॉश’ – बॉश कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 1942)
▶️1903 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 1950)
▶️1908 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 24 एप्रिल 1974)
▶️1911 : ‘राप्पल संगमेश्वर कृष्णन’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1914 : ‘ओमर अली सैफुद्दीन (तिसरा)’ – ब्रुनेईचा राजा यांचा जन्म.
▶️1915 : ‘क्लिफर्डशुल’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1917 : ‘आसिमा चॅटर्जी’ – भारतीय रसायनशास्त्र यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2006)
▶️1919 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 2010)
▶️1920 : ‘भालबा केळकर’ – नाट्य लेखक व अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1987)
▶️1935 : ‘प्रेम चोप्रा’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
▶️1943 : ‘तनुजा’ – अभिनेत्री यांचा जन्म.
▶️1950 : ‘डॉ. अभय बंग’ – समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1952 : ‘अंशुमान गायकवाड’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1957 : ‘कुमार सानू’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
▶️1965 : ‘अलका कुबल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1858 : ‘ग्रँट डफ’ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1789)
👉1870 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 28 सप्टेंबर 1803)
👉1882 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1800)
👉1939 : ‘सिग्मंड फ्रॉईड’ – आधुनिक मानसशास्त्राचा जनक यांचे निधन. (जन्म : 6 मे 1856)
👉1964 : ‘भार्गवराम विठ्ठल वरेरकर’ – नाटककार यांचे निधन. (जन्म : 27 एप्रिल 1883)
👉1999 : ‘गिरीश घाणेकर’ – मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते यांचे निधन.
👉2004 : ‘डॉ. राजा रामण्णा’ – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 28 जानेवारी 1925)
👉2012 : ‘कांतिलाल गिरीधारीलाल लाल’ – जादूगार यांचे निधन.
👉2015 : ‘दयानंद सरस्वती’ – भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1930)
✒️✒️ जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages) दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश सांकेतिक भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, त्यांना समाजात समान अधिकार मिळवून देणे आणि सांकेतिक भाषेचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करणे हा आहे. या दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली होती, आणि 2018 पासून त्याचा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे.
सांकेतिक भाषा ही बहिरे आणि कर्णबधिर लोकांच्या संवादासाठी एक महत्त्वाची साधने आहे. ती केवळ संवाद साधण्याचे माध्यम नसून, सांस्कृतिक ओळख आणि अधिकारांचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सांकेतिक भाषेचा प्रसार आणि तिच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असते. या दिवसामुळे समाजात समावेशकतेची भावना वाढीस लागते आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अधिकारांची जाणीव होते.
=_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_=☞ ̄ᴥ ̄☞
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अकांड तांडव करणे – रागाने आदळआपट करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 काहीही माहीत नसलेला – अनभिज्ञ
=_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_==_=
🙏 प्रार्थना 🙏
देह मंदिर चित्त मंदिर
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थनाऽऽऽ
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ।।धृ.॥
जीवनी नवतेज राहो, अंतरंगी भावनाऽऽऽ
सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, ध्यैर्य लाभो, सत्यता संशोधना॥१॥
सत्य, सुंदर मंगलाची…
भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासनाऽऽऽ
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू, बंधुतेच्या बंधना।।२।।
सत्य, सुंदर मंगलाची…
दुःखितांचे दुःख जावो, ही मनाची कामनाऽऽऽ
वेदना जाणावयाला, जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला, पौरुषाची साधना ॥३॥
सत्य, सुंदर मंगलाची….
—–@————@————–@————–@—————@—
📝 बोधकथा 📝
दृष्टीकोन बदला
एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दु:ख न मानण्याचे ठरवले.
तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.
📘 दिनांकानुसार पाढा :- २३ चा पाढा
२३ १३८
४६ १६१
६९ १८४
९२ २०७
११५ २३०
📝 प्रश्नावली १८५ 📝
प्रश्न १. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तरः लॉर्ड रिपन
प्रश्न २. संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर :- आळंदी
प्रश्न ३.महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?
उत्तरः बल्लारपूर
प्रश्न ४. कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे ?
उत्तरः नरसोबाची वाडी
प्रश्न ५. तपोवन ही कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- अमरावती
(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞
👉आपल्या माहितीसाठी
राज्य आणि त्यांचे स्थापना वर्ष.
◾️आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953
◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987
◾️आसाम : 26 जानेवारी 1950
◾️बिहार : 26 जानेवारी 1950
◾️छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000
◾️गुजरात : 1 मे 1960
◾️महाराष्ट्र : 1 मे 1960
◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
◾️हिमाचल प्रदेश : 1971
◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
◾️चालू घडामोडी : 2024
◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
◾️कर्नाटक : 1 नोव्हेंबर 1956
◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956
◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
◾️पश्चिम बंगाल : 1950
◾️सिक्कीम : 16 मे 1975
◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे)
◾️तेलंगणा : 2 जून 2014
◾️मेघालय : 21 जानेवारी 1972
◾️राजस्थान 30 मार्च 1949
◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
◾️नागालँड 1 डिसेंबर 1963
◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936
◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966
➖
➡️ केंद्रशासित प्रदेश स्थपणा वर्ष
◾️पुद्दुचेरी : 1 नोव्हेंबर 1954
◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019
◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019
◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020
भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत