📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २४ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️ जागतिक बॉलिवूड दिन
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
👉1664 : नेदरलँड्सने न्यू ॲमस्टरडॅम इंग्लंडला दिले.
👉1873 : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
👉1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
👉1932 : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बी.एस्सी. मुकुंदराव जयकर आदींच्या स्वाक्षऱ्या.
👉1946 : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
👉1948 : होंडा मोटार कंपनीची स्थापना.
👉1950 : पूर्व युनायटेड स्टेट्स पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले.
👉1954: AEC रूटमास्टर, लंडनची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली
👉1960 : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
👉1973 : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
👉1995 : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
👉1996 : 71 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
👉1999 : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
👉2007 : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-20 विश्वकप जिंकला
👉2008 : थाबो म्बेकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
👉2009 : G20 शिखर परिषद पिट्सबर्गमध्ये 30 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाली.
👉2014 : मार्स ऑर्बिटर मिशनने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले.
👉2015 : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत 717 लोक ठार.
👉2023 : नासाचे OSIRIS-REx कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह 101955 बेन्नूचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
👉1534 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे 4 थे गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1581)
👉1551 : ‘दासो दिगंबर देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1616)
👉1861 : ‘मॅडम भिकाजी रुस्तुम कामा’ – भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1936)
👉1870 : ‘जॉर्जेस क्लॉड’ – नीऑन लाईट चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1960)
👉1889 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1971)
👉1898 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1960)
👉1902 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरु आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1989)
👉1911 : ‘कॉन्स्टंटिन चेरेनेन्को’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1985)
👉1915 : ‘प्रभाकर शंकर मुजूमदार’ – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचा जन्म.
👉1921 : ‘डॉ. सखाराम गंगाधर मालशे’ – लेखक, समीक्षक व संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)
👉1922 : ‘गजानन वासुदेव बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1989)
👉1924 : ‘गुरू चरणसिंग तोहरा’ – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2004)
👉1925 : ‘ऑटो सिंग पेंटल’ – भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2004)
👉1936 : ‘शिवती आदितन’ – भारतीय उद्योजिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 2013)
👉1940 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1994)
👉1950 : ‘मोहिंदर अमरनाथ’ – क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1896 : ‘लुईस गेरहार्ड डी गेर’ – स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1818)
👉1939 : ‘कार्ल लामेल्स्’ – युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 जानेवारी 1867)
👉1998 : ‘वासुदेव पाळंदे’ – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक यांचे निधन.
👉2002 : ‘श्रीपाद जोशी’ – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक यांचे निधन.
🌍🌍 जागतिक दिन लेख
जागतिक बॉलिवूड दिन
जागतिक बॉलिवूड दिन हा चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. बॉलिवूड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत. बॉलिवूडचे चित्रपट संगीत, नृत्य, आणि नाट्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीने 100 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या प्रवासात अनेक कालातीत चित्रपट दिले आहेत. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडला एक जागतिक ओळख दिली आहे.जागतिक बॉलिवूड दिनाच्या निमित्ताने, या उद्योगाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी दिलेल्या योगदानाची आठवण केली जाते. भारतीय परंपरा, संस्कृती, आणि आधुनिकतेचं संमिश्र रूप बॉलिवूडमध्ये दिसून येतं, ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करतं. या दिवशी बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा उत्सव साजरा केला जातो.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 स्वप्न भंगणे : मनातील विचार कृतीत न येणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 अन्नदान करणारा – अन्नदाता.
🙏 प्रार्थना 🙏
हे शारदे माँ- हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे। हर शब्द तेरा, ये हर गीत तुझसे ।। हम हैं अकेले, हम हैं अधूरे। तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ। हे शारदे माँ
मुनियों ने समझी, गुणियों ने जानी। वेदों की भाषा, पुराणों की वाणी।। हम भी तो समझें, हम भी तो जानें। विद्या का हमको तू अधिकार दे माँ।। हे शारदे माँ
तू श्वेतवर्णी कमल पे विराजे। हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे।। मन से हमारे मिटा दो अँधेरे। उजालों का हमको तू संसार दे माँ।। हे शारदे माँ
📝 बोधकथा 📝
स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.
तात्पर्य – एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे
📘 दिनांकानुसार पाढा :- २४ चा पाढा
२४ १४४
४८ १६८
७२ १९२
९६ २१६
१२० २४०
→_→←_←→_→←_←→_(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞_←→_→←_←→_→←
📝 प्रश्नावली १८६ 📝
प्रश्न १. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?
उत्तरः विवेकसिंधू
प्रश्न २. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर :- घोलवड
प्रश्न ३. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न ४.महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर :- आंबोली
प्रश्न ५. पित क्रांती कशाशी संबंधित आहे?
उत्तर :- तेलबिया.
(☞゚∀゚)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞゚∀゚)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)(☞゚∀゚)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞゚∀゚)☞(☞゚∀゚)☞(☞ ಠ_ಠ)
👉 आपल्या माहितीसाठी.
⚙️भारताचे पहिले राष्ट्रपती: राजेंद्र प्रसाद
⚙️भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील
⚙️भारताचे पहिले उपराष्ट्रपती :सर्वपल्ली राधाकृष्णन
⚙️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेश चंद्र बॅनर्जी
⚙️भारताचे पहिले सरन्यायाधीश : एच जे कानिया
⚙️भारताचे पहिले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू
⚙️भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
⚙️भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
⚙️भारताचे पहिले व्हाईसरॉय : लॉर्ड कॅनिंग
⚙️भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक
⚙️भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू
⚙️पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी
⚙️लोकसभेचे पहिले सभापती : जी.व्ही.मावळणकर
⚙️भारताचे पहिले गृहमंत्री सरदार : वल्लभभाई पटेल
⚙️भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : पिनाकी चंद्र घोष
⚙️भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : निर्मला सीताराम