📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २६ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार
📙📘सुविचार :- फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️जागतिक सागरी दिन
🎗️अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
आजचा दिनविशेष – घटना
👉1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षतेच्या विशेष सिद्धांतावर पहिला शोधनिबंध प्रकाशित केला.
👉1910 : स्वदेशभिमानी रामकृष्ण पिल्लई या भारतीय पत्रकाराला त्रावणकोर सरकारवर टीका केल्याबद्दल अटक करून हद्दपार करण्यात आले.
👉1950 : इंडोनेशिया संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.
👉1954 : जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. 1,172 लोक मृत्युमुखी.
👉1959 : टायफून व्हेरा, रेकॉर्ड केलेल्या इतिहासात जपानला धडक देणारा सर्वात शक्तिशाली टायफून, जमिनीवर कोसळला, 4,580 लोक ठार झाले आणि सुमारे 1.6 दशलक्ष लोक बेघर झाले.
👉1960 : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
👉1973 : कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने विक्रमी वेळेत अटलांटिक महासागर नॉन-स्टॉप पार केला.
👉1984 : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
👉1990 : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे 21 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
👉1997 : गरुड इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले आणि 234 लोकांचा मृत्यू झाला.
👉2001 : व्यवस्थापकीय संपादक – सकाळ वृत्तपत्राचे संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
👉2009 : टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये 700 लोक मृत्युमुखी.
आजचा दिनविशेष – जन्म
▶️1820 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर ‘– यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1891)
▶️1849 : ‘इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह’ – नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1936)
▶️1858 : ‘मणिलाल नथुभाई त्रिवेदी’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑक्टोबर 1898)
▶️1870 : ‘क्रिस्चियन (दहावा)’ – डेन्मार्कचा राजा यांचा जन्म.
▶️1876 : ‘गुलाम कबीर नैयरंग’ – भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1852)
▶️1888 : ‘टी. एस. इलिय’ – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1965)
▶️1894 : ‘आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर’ – प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1955)
▶️1909 : ‘बिल फ्रान्स सीनियर’ – NASCAR (नेशनल एसोसिएशन फॉर स्टॉक कार ऑटो रेसिंग) चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)
▶️1918 : ‘एरिक मॉर्ली’ – मिस वर्ल्ड चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 नोव्हेंबर 2000)
▶️1923 : ‘देव आनंद’ – भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 2011)
▶️1927 : ‘रॉबर्ट कड’ – गेटोरेडे चे सह-संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 2007)
▶️1931 : ‘विजय मांजरेकर’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑक्टोबर 1983)
▶️1932 : ‘मनमोहन सिंग’ – भारताचे माजी पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1943 : ‘इयान चॅपल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
▶️1962 : ‘चंकी पांडे’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
▶️1972 : ‘मार्क हॅस्लाम’ – न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
▶️1981 : ‘सेरेना विल्यम्स’ – अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1902 : ‘लेवी स्ट्रॉस’ – लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1829)
➡️1952 : ‘जॉर्ज सांतायाना’ – स्पॅनिश तत्त्वज्ञानी यांचे निधन.
➡️1956 : ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ – भारतीय, मराठी उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 20 जून 1869)
➡️1977 : ‘उदय शंकर’ – भारतीय नर्तक यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1900)
➡️1988 : ‘शिवरामबुवा दिवेकर’ – रूद्रवीणा वादक यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1912)
➡️1989 : ‘हेमंतकुमार’ – गायक, संगीतकार आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 16 जून 1920)
➡️1996 : ‘विद्याधर गोखले’ – मराठी नाटककार, पत्रकार यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1924)
➡️2002 : ‘राम फाटक’ – मराठी संगीतकार, गायक यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1917)
➡️2008 : ‘पॉल न्यूमन’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 1925)
🌍 जागतिक दिन लेख
जागतिक सागरी दिन
जागतिक सागरी दिन (World Maritime Day) हा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. हा दिवस जागतिक समुद्री क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि समुद्रातील सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विषयांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना (IMO) ह्या दिनाच्या आयोजनासाठी जबाबदार आहे.
सागरी वाहतूक ही जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण ती मालवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मोठ्या प्रमाणावर जबाबदारी सांभाळते. सागरी सुरक्षा, शाश्वत विकास, आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज या दिवसाद्वारे अधोरेखित केली जाते. दरवर्षी, एक विशिष्ट थीम या दिवसासाठी निवडली जाते, ज्याद्वारे जागतिक समुद्री उद्योगातील अद्ययावत समस्यांवर लक्ष केंद्रीत केले जाते. या दिवसामुळे जागतिक सागरी उद्योगातील विविध आव्हानांना उत्तर देण्यासाठी जागरूकता वाढवणे शक्य होते.
🎆 आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन 🎇
आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) हा दिवस २६ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट जगातील सर्व अण्वस्त्रांचा पूर्णपणे नाश करून शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे आहे. अण्वस्त्रांचा धोका हा मानवी अस्तित्वासाठी सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे, आणि त्याचा वापर विनाशकारी परिणाम करू शकतो. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र आणणे आहे.
अण्वस्त्रांची शर्यत थांबवणे, या शस्त्रांच्या वाढीस प्रतिबंध करणे, आणि अण्वस्त्रविरहित जगाची उभारणी करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या दिवसाद्वारे अण्वस्त्रांच्या वापराचे गंभीर परिणाम लोकांसमोर आणले जातात आणि शांततापूर्ण उपाययोजनांसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले जाते.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 एकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हस्तगत करणे – ताब्यात घेणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
🙏 प्रार्थना 🙏
हे शारदे माँ- हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे। हर शब्द तेरा, ये हर गीत तुझसे ।। हम हैं अकेले, हम हैं अधूरे। तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ। हे शारदे माँ
मुनियों ने समझी, गुणियों ने जानी। वेदों की भाषा, पुराणों की वाणी।। हम भी तो समझें, हम भी तो जानें। विद्या का हमको तू अधिकार दे माँ।। हे शारदे माँ
तू श्वेतवर्णी कमल पे विराजे। हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे।। मन से हमारे मिटा दो अँधेरे। उजालों का हमको तू संसार दे माँ।। हे शारदे माँ
📝 बोधकथा 📝
एकीचे बळ
एक गरीब शेतकरी असतो.त्याला चार मुले असतात.ती आपसात नेहमी भांडत असतात. एकमेकांचे हेवेदावे करत असतात. गरीब शेतकरी त्यांचे भांडण पाहून खूप कंटाळला. त्यांना बोध करण्यासाठी शेतकऱ्यांने एक आयडिया केली.
एक दिवस शेतकऱ्यांने एक मोळी भर काड्या आणल्या. आपल्या चारही मुलांना बोलावले. एक-एक काडी त्यांच्या हातात दिली . त्यांना ती हाताने मोडायला सांगितली. त्या चारही मुलांनी त्या एक-एक काडीचे दोन-दोन तुकडे केले.
त्यानंतर शेतकऱ्यांने नवीन काड्याच्या मोळीचा भारा आणला. तो एकत्र घट्ट बांधून त्या मुलांना तो भारा हाताने मोडायला सांगितला. तेव्हा एकाही मुलाला ती काड्याची मोळी हाताने मोडता आली नाही. तेव्हा त्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना समजून सांगितले की एकीचे बळ खूप जास्त असते. त्या मोळीप्रमाणे तुमच्यात एकी ठेवा .एकजूट ठेवा.तेव्हा तुमचा पराभव जगातील कोणतीच शक्ती करणार नाही.
तात्पर्य-एकीचे बळ खूप मोठे असते.
📘 दिनांकानुसार पाढा :- २६ चा पाढा
२६ १५६
५२ १८२
७८ २०८
१०४ २३४
१३० २६०
☞ ̄ᴥ ̄☞(☞ ಠ_ಠ)☞☞ ̄ᴥ ̄☞☞ ̄ᴥ ̄☞(☞ ಠ_ಠ)☞☞ ̄ᴥ ̄☞☞ ̄ᴥ ̄☞
📝 प्रश्नावली १८७ 📝
प्रश्न १. सपाट आरशातील वस्तूची प्रतिमा कशी असते ?
उत्तर :- वास्तविक
प्रश्न २. दंतवैद्य कोणता आरसा वापरतात ?
उत्तर :- अंतर्वक्र आरसा
प्रश्न ३. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर :- यकृत ( Liver )
प्रश्न ४. प्रतिदिन श्वासाद्वारे सुमारे किती पाणी शरीराच्या बाहेर टाकले जाते ?
उत्तर :- सुमारे 400ml पाणी
प्रश्न ५. धातूंचा राजा कोणत्या धातूला म्हटले जाते?
उत्तर :- सोने
=======$$$$$=====$$$$$=====$$$$$=====$$$$$=====
👉 आपल्या माहितीसाठी
📌 नोटा व त्यावरील चित्रे
➡️ 10 रुपयांची नोट : कोणार्क सूर्य मंदिर
◾️कोणार्क सूर्य मंदिर , पुरी जिल्हा -ओडीसा
◾️सुर्य देवाला समर्पित मंदिर आहे
◾️6 घोडे आणि 24 चाके आहेत रथाला
◾️1984 मध्ये UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा
◾️13 व्या शतकातील मंदिर आहे
◾️गंगा राजवंशातील राजा नरसिंह देवा 1 याच्या 1250 दरम्यान बांधले
➖
➡️ 20 रुपयांच्या नोट : वेरूळ लेणी
◾️छत्रपती संभाजीनगर जिल्हा ( महाराष्ट्र)
◾️276 फूट लांब, 154 फूट रुंद
◾️एलोरा हे राष्ट्रकूट शासकांच्या काळात बांधले गेले आहे
◾️1983 :युनेस्कोने संस्कृतीक जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे
◾️600-1000 CE या कालखंडातील कलाकृती
◾️बौद्ध , जैन आणि हिंदू लेणी इथे आहेत
◾️एकूण 34 लेणी आहेत.
⭐️12 बौद्ध (लेणे क्र. 1 – 12)
⭐️17 हिंदू (लेणे क्र. 13 – 29)
⭐️5 जैन (लेणे क्र. 30 – 34) लेणी
◾️इ.स. 1951 साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले
➖
➡️ 50 रुपयांच्या नोटेवर : हंपी मंदिर
◾️हंपी -विजयनगर जिल्हा – कर्नाटक
◾️तुंगभद्रा नदी काठावर 4187, 24 हेक्टर क्षेत्रफळ
◾️1336 ते 1565 विजयनगर साम्राज्याची राजधानी होती
◾️हंपी मध्ये विरुपाक्ष, लक्ष्मी नरसिंह, हेमाकुटा हिल, मोठे शिवलिंग आणि विठ्ठल मंदिरे
➖
➡️ 100 च्या नोटे वर राणी ची वाव
◾️एक विहीर आहे
◾️गुजरात पाटण तालुका
◾️2014 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे
◾️राजा भीमदेव प्रथमची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव 11 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधली
◾️2016 मध्ये, रानी की वावला सर्वात स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण म्हणून मान्यता
◾️7 मजली आहे ज्यावर देव देवतांची शिल्प कोरली आहेत
➖
➡️ 200 रुपये – सांची स्तूप
◾️सांची – रायसेन जिल्हा – मध्यप्रदेश
◾️जगातील सर्वोत्तम बौद्ध कलाकृतींनी सजलेला सांचीचा महान सम्राट अशोकाने सांची स्तूप बांधला
◾️जगातील सर्वोत्तम बौद्ध कलाकृतींनी सजलेला सांचीचा महान स्तूप आहे
◾️ही इमारत 120 फूट (37 मीटर) रुंद आणि 54 फूट (17 मीटर) उंच आहे.
◾️1989 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले गेले .
➖
➡️ 500 रुपयांची नोट : लाल किल्ला
◾️मुघल सम्राटांचे मुख्य निवासस्थान म्हणून काम करतो
◾️12 मे 1639 रोजी सम्राट शहाजहानने आपली राजधानी आग्राहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू केले
◾️वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांनी बांधला ( यांनीच ताजमहल बांधला होता)
◾️उंची : 18–33 मी (59–108 फूट)
◾️15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरी गेटवर भारतीय ध्वज फडकविला
◾️2007 मध्ये लाल किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖