“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 188

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

         📖 वाचाल तर वाचाल 📖

    📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २७ सप्टेंबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार

📙📘सुविचार :-  👏सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे👏


📙📘📙 दिनविशेष

🌍🌍आजचा जागतिक दिन


🎗️जागतिक पर्यटन दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

➡️1905 : आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
➡️1908 : फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.
➡️1925 : डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
➡️1940 : जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये 5,000 लोक ठार झाले.
➡️1958 : मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.
➡️1961 : सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
➡️1996 : तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.
➡️1980 : जागतिक पर्यटन दिन
➡️2003 : SMART-1 उपग्रह प्रक्षेपित झाला
➡️2007 : नासाने लघुग्रहाच्या पट्ट्यासाठी डॉन प्रोब लाँच केले.
➡️2014 : जपानमध्ये माउंट ओंटेकचा उद्रेक झाला.


✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

👉1907 : ‘भगत सिंग’ – भारतीय क्रांतिकारी यांचा जन्म.
👉1907 : ‘वामनराव देशपांडे’ – संगीत समीक्षक यांचा जन्म.
👉1933 : ‘यश चोप्रा’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑक्टोबर 2012)
👉1953 : ‘माता अमृतानंदमयी’ – भारतीय धर्मगुरू यांचा जन्म.
👉1974 : ‘पंकज धर्माणी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
👉1981 : ‘लक्ष्मीपती बालाजी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

▶️1833 : ‘राजाराम मोहन रॉय’ – समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1772)
▶️1929 : ‘शि. म. परांजपे’ – लेखक व पत्रकार यांचे निधन. (जन्म : 27 जून 1864)
▶️1972 : ‘एस. आर. रंगनाथन’ – भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1892)
▶️1975 : ‘तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री’ – रसायन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 फेब्रुवारी 1900)
▶️1992 : ‘अनुताई वाघ’ – पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 17 मार्च 1910)
▶️1999 : ‘डॉ. मेबल आरोळे’ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1935)
▶️2004 : ‘शोभा गुर्टू’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1925)
▶️2008 : ‘महेन्द्र कपूर’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 9 जानेवारी 1934 – अमृतसर)
▶️2012 : ‘संजय सूरकर’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1959)
▶️2015 : ‘सय्यद अहमद’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 6 मार्च 1945)

🌍  जागतिक दिन लेख

                  🏞️ जागतिक पर्यटन दिन 🏞️
जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश जागतिक स्तरावर पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम यावर प्रकाश टाकणे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेने (UNWTO) हा दिवस 1980 मध्ये प्रथम साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यटन उद्योग हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्षेत्र असून, तो रोजगार निर्मिती, आर्थिक वाढ, आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा प्रमुख स्रोत आहे.

पर्यटनाने वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळते. या दिवसाचे महत्त्व वाढते कारण पर्यटनामुळे जागतिक एकात्मता वाढते आणि विविध देशांमधील परस्पर समजूतदारपणा वाढतो. 2023 च्या जागतिक पर्यटन दिनाचा थीम होता “पर्यटन आणि हरित गुंतवणूक,” ज्यामुळे शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे.
======££££====££££====££££====££££====      


            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  गाड्याबरोबर नळयाची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहनांचाही फायदा होणे.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  घाम गाळणे – खूप कष्ट करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक
→⁠_⁠→←⁠_⁠←→⁠_⁠→←⁠_⁠←→⁠_⁠→←⁠_⁠←→⁠_⁠→→⁠_⁠→←⁠_⁠←

                     🙏 प्रार्थना 🙏

     देवा तुझे किती…
              
  देवा तुझे किती सुंदर आकाश
  सुंदर प्रकाश सूर्य देतो॥
  सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर।
चांदणे सुंदर पडे त्यांचे॥

सुंदर ही झाडे सुंदर पाखरे।
किती गोड बरे गाणे गाती।।
सुंदर वेलींची सुंदर ही फुले।
तशी आम्ही मुले देवा तुझी॥
                                                           
                     📝 बोधकथा 📝

                     मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

तात्पर्य– संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- २७ चा पाढा

                                  २७           १६२
                                  ५४           १८९
                                  ८१           २१६
                                 १०८          २४३
                                 १३५          २७०

    🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆

                📝 प्रश्नावली १८८ 📝

प्रश्न १. जगातील रुंदीने सर्वात मोठी असणारी नदी कोणती ?
उत्तर :- ॲमेझॉन नदी

प्रश्न २. भारतात पहिल्या सर्वसाधारण निवडणुका कधी झाल्या ?
उत्तर :- १९५१-५२

प्रश्न ३. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे —- म्हणतात ?
उत्तर :- परिभ्रमण

प्रश्न ४.  लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रामजी कृष्ण वर्मा

प्रश्न ५. देवीच्या साडेतीन पिठा पैकी अर्धपीठ कोणते ?
उत्तर :- वणी ( नाशिक )

⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏭️⏮️

👉 आपल्या माहितीसाठी

महाराष्ट्रातील 38 भौगोलिक कृषी मानांकने
यांची नावे आणि जिल्हा लक्षात ठेवा जोड्या लावा ला नक्की विचारतील

◾️डहाणू घोलवड चिकू : पालघर जिल्हा
◾️बहाडोली जांभूळ : पालघर
◾️जांभूळ : बदलापूर (ठाणे)
◾️पांढरा कांदा : अलिबाग (रायगड)
◾️काजू : (वेंगुर्ला )सिंधुदुर्ग
◾️कोकम : रत्‍नागिरी सिंधुदुर्ग
◾️कोकण हापूस : रत्नागिरी
◾️अंजीर : पुरंदर (पुणे)
◾️आंबेमोहर तांदुळ : पुणे
◾️डाळिंब : सोलापूर
◾️ज्वारी : (मंगळवेढा) सोलापूर
◾️अजरा घनसाळ राईस : कोल्हापूर
◾️गुळ : कोल्हापूर
◾️बेदाणा : सांगली
◾️स्ट्रॉबेरी : महाबळेश्वर (सातारा)
◾️द्राक्ष : नाशिक
◾️व्हॅली वाईन : नाशिक
◾️लासलगाव कांदा : नाशिक
◾️केळी : जळगाव
◾️भरीत वांगी : जळगाव
◾️आमचूर : नवापूर (नंदुरबार)
◾️मिरची : नंदुरबार
◾️मोसंबी : जालना
◾️दगडी ज्वारी : जालना
◾️सिताफळ : बीड
◾️मराठवाडा केसर : छत्रपति संभाजीनगर
◾️चिंचोली चिंच : लातूर
◾️चालुघडामोडी : 2024
◾️बोरसुरी डाळ : लातूर
◾️काष्टी कोथिंबीर : लातूर
◾️कुंथलगिरी खवा : धाराशिव
◾️बसमत हळद : हिंगोली
◾️सांगली हळद : सांगली
◾️वायगाव हळद : वर्धा
◾️लाल मिरची :भिवपुरी (नागपुर)
◾️चिन्नोर भात : भंडारा
◾️संत्री : नागपूर



भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये 38 कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Share This Article