जुनी पेन्शन मागणीसाठी सोनार मामा गांधी जयंतीपासून उपोषणाला बसणार.OPS
जुनी पेन्शन मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून अनेक भव्यदिव्य आंदोलने केली जात आहेत. नुकतेच शिर्डी येथे संघटनेचे भव्य असे पेन्शन राज्य महाअधिवेशन पार पडले. शिर्डी येथील अधिवेशनात संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी गांधी जयंती पासून सेवाग्राम येथे आमरण उपोषणास बसण्याची घोषणा केली. राज्याध्यक्ष यांच्या घोषणेने प्रेरित होऊन भडगाव येथील जुनी पेन्शन लढ्यातील महाराष्ट्रातील लढवय्ये शिलेदार म्हणून ओळख असलेले, जुनी पेन्शन लढ्यातील स्टार प्रचारक, संपूर्ण महाराष्ट्रात पेन्शन मामा म्हणून ओळखले जाणारे आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर आमरण उपोषणाला बसणार आहेत. सोनार यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास सन २०१७ त्यांनी जुनी पेन्शन लढ्यास स्वतःला वाहून घेतलेले आहे.
आजवर प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. जुनी पेन्शन लढ्याच्या जनजागृतीसाठी त्यांनी आजवर
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांना प्रेरित केलेले आहे. पेन्शन द्या मत घ्या, जीपीएस गो बॅक असे मुंडन करून स्वतःच्या डोक्यावर लिहिलेले आहे. तसेच वीस जिल्ह्यातून दुचाकी वरून पेन्शन संघर्ष यात्राही काढली आहे. सदर आमरण उपोषणा विषयी सोनार यांनी माहिती देताना सांगितले
की राज्याध्यक्ष, राज्यसचिव यांच्यासह महाराष्ट्रातील ७५ कर्मचारी आमरण उपोषणास बसणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सेवाग्राम येथे यावे असे आवाहन सोनार यांनी केलेले आहे.