📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २२ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- आळस हा माणसाचा शत्रू आहे.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1797 : बलूनमधून 1000 मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
1859 : स्पेनने मोरोक्कोविरुद्ध युद्ध घोषित केले.
1875 : अर्जेंटिनामधील पहिले टेलिग्राफिक कनेक्शन कार्यान्वित झाले
1927 : निकोला टेस्लाने सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
1938 : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशीन बनवले.
1963 : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
1994 : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
2008 : भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1873 : ‘तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ’ – अमृतानुभवी संत यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑक्टोबर 1906)
1900 : ‘अश्फाक़ुला खान’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1927)
1931 : ‘भवानी सिंग’ – जयपूरचा महाराजा यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2011)
1937 : ‘कादर खान’ – चित्रपट अभिनेता, पटकथा आणि संवाद लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 2018)
1942 : ‘रघूवीर सिंह’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1999)
1947 : ‘दीपक चोप्रा’ – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक यांचा जन्म.
1952 : ‘ए.एस. किरण कुमार’ – भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ यांचा जन्म.
1964 : ‘अमित शहा’ – भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांचा जन्म.
1988 : ‘परिणीती चोप्रा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1917 : ‘चार्ल्स पार्डे ल्यूकिस’ – इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक यांचे निधन.
1933 : ‘बॅ. विठ्ठलभाई पटेल’ – थोर देशभक्त यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1871)
1978 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचे निधन. (जन्म : 4 ऑगस्ट 1894)
1991 : ‘ग. म. सोहोनी’ – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक यांचे निधन.
1998 : ‘अजित खान’ – हिंदी चित्रपटांतील खलनायक यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1922)
2000 : ‘अशोक मोतीलाल फिरोदिया’ – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती यांचे निधन.
2014 : ‘अशोक कुमार’ – भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर यांचे निधन.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 जिवाला जीव देणारा – जिवलग.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
देवा तुझे किती सुंदर आकाश
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो॥
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर।
चांदणे सुंदर पडे त्यांचे॥
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे।
किती गोड बरे गाणे गाती।।
सुंदर वेलींची सुंदर ही फुले।
तशी आम्ही मुले देवा तुझी॥
🔊 बोधकथा 🔊
अनुभव
एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याच्या सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला “महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो.”
राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपऱ्यात जाऊन बसला.त्याचे हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला ” पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय.”
प्रवाशी हसून म्हणाला ” महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज.”
तात्पर्य ::~जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही, तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते. त्यामुळे असे वागावे की, दुसऱ्याना त्रास होऊ नये.
📘 दिनांकानुसार पाढा :- २२ चा पाढा
२२ १३२
४४ १५४
६६ १७६
८८ १९८
११० २२०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २०७ 📝
प्रश्न १. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
उत्तर :- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
प्रश्न २. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : – जिल्ह्याचे पालकमंत्री
प्रश्न ३. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
उत्तर :- जिल्हाधिकारी
प्रश्न ४. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
उत्तर :- दहा (स्थायी+9 विषय समित्या)
प्रश्न ५. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर :- जिल्हा परिषद अध्यक्ष
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आजचा परिपाठ.
🔖कृषिविषयक प्रमाणे व एकके:
1. 1 एकर = 43,560 चौ. फूट
2. 1 एकर = 40 गुंठे
3. 1 एकर = 1,702 बिघा
4. 1 एकर = 0.40671 हेक्टर
5. 1 एकर = 4,840 चौ. यार्ड
6. 1 विघा = 25,600 चौ. फूट
7. 1 बिघा = 23.5 गुंठा
8. 1 चौ. मैल = 640 एकर
9. 1 गुंठा = 1,089 चौ. फुट
10. 1 गुंठा = 1 आर
11. 1 हेक्टर = 2.5 एकर
12. 1 हेक्टर = 100 गुंठा
13. 1 हेक्टर = 100 आर
14. 1 एकर = 40 आर