शिष्यवृत्ती परीक्षा – शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ. Scholarship Exam

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी मुदतवाढ

                          

  प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

MSCE पुणे यांचे पत्र पाहण्यासाठी –

शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक –

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद अधिकृत संकेतस्थळ 

Share This Article