“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 228. Prashnavali 228

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 228. Prashnavali 228.

  📖 वाचाल तर वाचाल 📖

         📘आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १३ डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार :- शुक्रवार

📙📘सुविचार :- मानवाचा सर्वांगीण विकास घडविते तेच खरे शिक्षण.

📙📘📙 दिनविशेष


🖊️ आजचा दिनविशेष – घटना

1941 : दुसरे महायुद्ध – हंगेरी आणि रोमानियाने युनायटेड स्टेट्सविरुद्ध युद्ध घोषित केले.
1991 : मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
2001 : जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला.
2002 : ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001 फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2016 : सायरस मिस्त्री यांना TCS चे अध्यक्ष आणि संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले.
2016 : अँडी मरे आणि अँजेलिक कर्बर यांना ITF (आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ) द्वारे 2016 चे विश्वविजेते घोषित करण्यात आले.

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म

1780 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1849)
1804 : ‘मेजर थॉमस कॅन्डी’ – कोशकार व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1877)
1816 : ‘वर्नेर व्हॅन सीमेन्स’ – सीमेन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1892)
1899 : ‘पांडुरंग सातू नाईक’ – छायालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1976 – मुंबई)
1940 : ‘संजय लोळ’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुन 2005)
1954 : ‘हर्षवर्धन’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1955 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.


🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1784 : ‘सॅम्युअल जॉन्सन’ – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 1709)
1922 : ‘हेंस हाफस्टाइन’ – आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1861)
1930 : ‘फ्रिट्झ प्रेग्ल’ – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1869)
1986 : ‘स्मिता पाटील’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 17 ऑक्टोबर 1955)
1994 : ‘विश्वनाथ अण्णा कोरे’ – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑक्टोबर 1917)
1996 : ‘श्रीधर पुरुषोत्तम लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांचे निधन.
2006 : ‘लामर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1932)

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दु:खदायी ठरते .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 हस्तक्षेप करणे – ढवळाढवळ करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा


⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

                      🙏 प्रार्थना 🙏

                अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे,तू सर्वांचा पिता
नेमाने तुझ नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा ॥धृ॥

सूर्य चंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर, डोंगर फळे फुले पाखरे ॥१॥

अनेक नावे तुला, तुझे रे दहा दिशांना घर
करिसी देवा सारखीच तू माया, सगळ्यावर ॥२॥

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी हौस एवढी पुरवी देवा, हिच एक मागणी ॥३॥


                   📝 बोधकथा 📝

             गर्विष्ठ मेणबत्ती

एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलवले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, “ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.” तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, “अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झळकेने विझून गेले आहेत ‘का?”

तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
                           
       📘 दिनांकानुसार पाढा :- १३ चा पाढा

                            १३            ७८
                            २६            ९१
                            ३९            १०४
                            ५२            ११७
                            ६५            १३०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️   

              📝 प्रश्नावली 228 📝

प्रश्न १. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?

उत्तर :- तिसरा

प्रश्न २. भारतातील पहिला उपग्रह कोणता ?

उत्तर :- आर्यभट्ट

प्रश्न ३. भारतातील चलनी नोटा कोणत्या बँकेकडून बनविल्या जातात ?

उत्तर :- रिझर्व बँक ऑफ इंडिया

प्रश्न ४. अवकाशातील सात ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात ?

उत्तर :- सप्तर्षी

प्रश्न ५ . साखर,मीठ आणि पाणी यांच्या एकत्रित मिश्रणला काय म्हणतात ?

उत्तर :- जलसंजीवनी

⏭️⏪⏭️⏪⏭️⏪⏭️⏪🎌⏪⏭️⏪⏭️⏪⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

🌹 भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता.

♟️गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा केला पराभव.

Share This Article