“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 228. Prashnavali 228
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १४ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- शनिवार
📙📘सुविचार :- आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते.
📙📘📙 दिनविशेष
🖊️ आजचा दिनविशेष – घटना
1903 : राइट बंधूंनी किट्टीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
1939 : फिनलंडवर आक्रमण केल्याबद्दल सोव्हिएत युनियनला लीग ऑफ नेशन्समधून हद्दपार केले.
1941 : दुसरे महायुद्ध – जपानने थायलंडसोबत सहकार्य करार केला.
1961 : टांझानिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
1950 : UNHCR ची स्थापना.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1503 : ‘नोट्रे डॅम’ – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 1566)
1546 : ‘टायको ब्राहे’ – डच खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1601)
1895 : ‘जॉर्ज (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 6 फेब्रुवारी 1952)
1918 : ‘बी. के. एस. अय्यंगार’ – योगाचार्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 2014)
1924 : ‘राज कपूर’ – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1988)
1928 : ‘प्रसाद सावकार’ – गायक व नट यांचा जन्म.
1934 : ‘श्याम बेनेगल’ – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.
1939 : ‘सतीश दुभाषी’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1980)
1946 : ‘संजय गांधी’ – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1980)
1953 : ‘विजय अमृतराज’ – भारतीय लॉनटेनिसपटू यांचा जन्म.
1984 : ‘राणा दग्गुबटी’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1799 : ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 22 फेब्रुवारी 1732)
1943 : ‘जॉन हार्वे केलॉग’ – कॉर्नफ्लेक्सचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1852)
1966 : ‘शंकरदास केसरीलाल’ – गीतकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1923)
1977 : ‘गजानन दिगंबर माडगूळकर’ – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1919)
2006 : ‘अत्लम एर्टेगुन’ – अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1923)
2013 : ‘सी एन करुणाकरन’ – भारतीय चित्रकार यांचे निधन.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाही .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 पांघरून घालणे – दोष झाकणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 वनस्पतीच्या मुळाशी पाणी घालण्यासाठी केलेला खोलगट भाग – आळे
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
🙏 प्रार्थना 🙏
केशवा, माधवा
केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा ॥धृ॥ तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा ॥१॥ वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी नंदाघरच्या गायी हाकिशी गोकुळी यादवा ॥२॥
वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ॥३॥
📝 बोधकथा 📝
किंमत
पुर्वीच्या काळी एका राज्यात एक साधू महाराज राहत होते. त्यांचे स्वास वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वस्तूती अचूक किंमत सांगत होते. त्या राज्यातील राजाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने साधू महाराजांना दस्वारात बोलावले. साधू महाराज दरबारात पोहचल्यानंतर राजाने त्यांना म्हणाला की, तुम्ही आमच्या राजकुमाराची किंमत सांगू शकता का ?
राजाचा हा प्रश्न ऐकून साधू, महाराज गोंधळात पडले. परंतू राजाने प्रश्न केल्यामुळे त्यांनी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ठरवले. राजकुमाराचे निरीक्षण करत साधू महाराज म्हणाले, महाराज मी तुमच्या राजकुमाराची किंमत सांगण्यासाठी तयार आहे. परंतू माझी एक अट आहे. मी तुम्हाला राजकुमाराची किंमत सांगितल्यानंतर तुम्ही क्रोधित होणार नाही असे वचन था. राजाने साधू महाराजांची अट मान्य करत त्यांना क्रोध व्यक्त न कसण्याचे वचन दिले. नंतर साधू महाराज म्हणाले, महाराज तुमच्या राजकुमारावी किंमत दोन आण्यांपेक्षा अधिक नाही. साथू महाराजांचे हे उत्तर ऐकताच राजाला समजले की, जर सजकुमार सर्व साधारण मनुष्यासारखे काम करत असेल तर त्याला कोणीही दोन आण्यांपेक्षा जास्त पैसे देणार नाही.
तात्पर्य :- मनुष्याला आपली योग्यता ओळखता आली पाहिजे. त्यानंतस्व त्याला कुटुंबात, समाजात योग्य मान मिळेल
📘 दिनांकानुसार पाढा :- १४ चा पाढा
१४ ८४
२८ ९८
४२ ११२
५६ १२६
७० १४०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝 प्रश्नावली २२९ 📝
प्रश्न १. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त येणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात ?
उत्तर :- धमन्या
प्रश्न २. शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात ?
उत्तर :- शिरा / नीला
प्रश्न ३. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये मध्ये कोणते आम्ल असते ?
उत्तर :- फॉर्मिक आम्ल
प्रश्न ४. कोणत्या वायूला ‘ Life Air ‘असे म्हणतात ?
उत्तर :- ऑक्सिजन
प्रश्न ५ . लसीकरणाचा जनक अशी कोणाला म्हटले जाते ?
उत्तर :- एडवर्ड जेन्नर
⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉आपल्या माहितीसाठी
🏆 राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर
◾️ठिकाण – विज्ञान भवन , नवी दिल्ली
◾️दिनांक – 11 डिसेंबर 2025
◾️विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले
◾️एकूण 46 कोटी रुपयांची बक्षीस दिले गेले
◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
◾️राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सहसा दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो
◾️या वर्षी स्पर्धेत 1.94 लाख ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 42 पुरस्कार विजेत्या पंचायतींपैकी 42% महिलांचे नेतृत्व होते
◾️या कार्यक्रमात पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी ‘पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथा’ या पुस्तिकेचे अनावरण केले.
➖
🏆राज्यांच्या नुसार क्रमांक
1️⃣पहिला क्रमांक – ओडीसा आणि त्रिपुरा (7 पुरस्कार)
2️⃣दुसरा क्रमांक – महाराष्ट्र (6 पुरस्कार)
3️⃣तिसरा क्रमांक – आंध्रप्रदेश ( 4 पुरस्कार)
3️⃣चौथा क्रमांक – बिहार आणि हिमाचल (3 पुरस्कार)
➖
💘 पुरस्काराच्या श्रेणी कोणत्या आहेत
1】दीनदयाळ उपाध्याय पंचायत सातत विकास पुरस्कार (DDUPSVP)
2】नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत विकास पुरस्कार
3】ग्राम उर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार
4】कार्बन न्यूट्रल विषेश पंचायत पुरस्कार
5】पंचायत क्षेत्र निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार
➖
💘 6 पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी
1️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत- नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार प्रथम क्रमांक (1.5 कोटी)
2️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत – ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत प्रथम क्रमांक (1 कोटी)
3️⃣बेला ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम (1 कोटी)
4️⃣मोडाळे ग्रामपंचायत(नाशिक) – स्वच्छ व हरित पंचायत (तृतीय क्रमांक)
5️⃣यशदा अकादमी (पुणे) – पंचायत क्षमतानिर्माण सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत तृतीय क्रमांक (50 लाख)
6️⃣तितोरा पंचायत (जिल्हा गोंदिया) – सर्वोत्कृष्ट ब्लॉक पंचायत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖