“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 230. Prashnavali 230

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 230.

  📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १६ डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार :- सोमवार

📙📘सुविचार :- केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे


📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

⚡ डिजिटल मार्केटिंग डे
⚡ विजय दिवस

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना

1497 : वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला फेरी मारली.
1773 : अमेरिकन क्रांती – बोस्टन टी पार्टी.
1854 : भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात स्थापन झाले.
1903 : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल व्यवसायासाठी उघडले.
1928 : मुंबई-पुणे रेल्वे सेवा बोगद्यातून सुरू झाली.
1946 : थायलंड संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
1971 : भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करली.
1985 : कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक प्रथम ब्रीडर अणुभट्टी राष्ट्राला समर्पित करण्यात आली.
1991 : पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन वेगळे झाला कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
2006 : अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी एका साथीदारासह अंतराळ यानाच्या बाहेर जाऊन 7 तास 31 मिनिटांत विद्युत यंत्रणा दुरुस्त केली.

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म

1770 : ‘लुडविग व्हान बीथोव्हेन’ – कर्णबधिर संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1827)
1775 : ‘जेन ऑस्टीन’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1817)
1882 : ‘जॅक हॉब्ज’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 1963)


🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1960 : ‘चिंतामण गणेश कर्वे’ – मराठी कोशकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1893)
1965 : ‘डब्ल्यू. सॉमरसेट मॉम’ – इंग्लिश लेखक आणि नाटकाकर यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1874)
1980 : ‘कर्नल सँडर्स’ – केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1890)
2002 : ‘काशिनाथ सखाराम देवल’ – सर्कस सम्राट निधन.
2004 : ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ – नाट्य आणि चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1954)

🖊️🌍 जागतिक दिन लेख

                विजय दिवस
      विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस 1971 साली भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानिमित्त साजरा केला जातो. या युद्धादरम्यान, भारताने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून स्थापन करण्यात निर्णायक भूमिका बजावली.

       16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली, ज्यामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. हा विजय भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य, आणि बलिदानाचे प्रतीक आहे.विजय दिवसादिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. युद्धात प्राणार्पण केलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. विशेषतः नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे अमर जवान ज्योतीसमोर सैन्यदलाद्वारे अभिवादन केले जाते.
        हा दिवस भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे स्मरण करून देतो आणि आपल्याला देशभक्तीची प्रेरणा देतो. विजय दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असून, तो देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. जय जवान, जय भारत!

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 ओस पडणे – भकास होणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधारी


⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

                      🙏 प्रार्थना 🙏

           शोधिसी मानवा

शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा,आपुल्या अंतरी ॥धृ॥
मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ,
सूर येती कसे, वाजते बासरी ,
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥१॥
गंध का हासतो, पाकळी सारुनी,
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी
भोवताली तुला, साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥२॥
भेटतो देव का, पूजनी अर्चनी ,
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी ,
शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ,
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥३॥    

                   📝 बोधकथा 📝

                   महत्व आईचे

एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,” स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.” स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तिच्या हाती देत ते म्हणाले,” बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.” दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला,” स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.” स्वामी मंद स्मित करत म्हणाले,” बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे. “

तात्पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही.       


       📘 दिनांकानुसार पाढा :- १६ चा पाढा

                            १६            ९६
                            ३२            ११२
                            ४८            १२८
                            ६४            १४४
                            ८०            १६०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️   

            📝 प्रश्नावली 230 📝

प्रश्न १. कोणत्या गॅसला ‘हास्य गॅस’ असे म्हणतात ?
उत्तर :- नायट्रस ऑक्साईड (N2O)

प्रश्न २.जगातील सर्वात लहान हाड कोणते आहे आणि ते कोणत्या शरीराच्या भागात आढळते?
उत्तर : – स्टेप्स, कानात.

प्रश्न ३. कोणत्या ग्रहाला ‘ब्लू प्लॅनेट’ असे म्हणतात ?
उत्तर :- पृथ्वी

प्रश्न ४. जगातील सर्वात उंच मनुष्य निर्मित रचना कोणती आहे ?
उत्तर :-  बुर्ज खलिफा, दुबई

प्रश्न ५. मधुमेहाच्या उपचारासाठी काय वापरले जाते ?
उत्तर :- इन्सुलिन.

⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी


महत्वाचे✨
➖➖➖➖➖➖➖
◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे
◾️जगात एकूण : 1200 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही आणि आग्रा लाल किल्ला
◾️इटली मध्ये : 59 स्थळे आहेत (पहिला नंबर)
◾️चीन मध्ये :57 स्थळे (दुसरा नंबर)
◾️फ्रान्स आणि जर्मनी : 52 स्थळे ( तिसरा)
◾️भारत : 43 स्थळे ( सहावा क्रमांक)

◾️भारतातील 2023 मध्ये दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता
🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल
🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक

◾️भारतातील 2024 मध्ये 🎆
🔥 ‘मोइदाम्स’ : आसाम ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे ( सांस्कृतिक मध्ये येते)

⭐ भारताच्या शेजारील देशांच्या कडे किती वारसा स्थळे आहेत
◾️पाकिस्तान : 6 वारसा स्थळे
◾️नेपाळ : 4 वारसा स्थळे
◾️अफगाणिस्तान : 2 वारसा स्थळे
◾️चीन :  57 वारसा स्थळे
◾️श्रीलंका : 8 वारसा स्थळे
◾️म्यानमार : 2 वारसा स्थळे
◾️बांग्लादेश : 3 वारसा स्थळे
⚠️ भारतात 43 वारसा स्थळे आहेत त्यापैकी

⭐️सांस्कृतिक वारसा स्थळे: > 35 आहेत
⭐️नैसर्गिक वारसा स्थळे  :> 7 आहेत
⭐️मिश्र वारसा स्थळे :>1 आहे
मोइदाम्स’ : आसाम हे सांस्कृतिक वारसा स्थळ मध्ये येते

⭐️ महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत ⭐️

🔥1983: अजिंठा ,1983: वेरूळ ( सांस्कृतिक)
🔥1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी ( सांस्कृतिक)
🔥2004 : CST मुंबई ( सांस्कृतिक)
🔥2012 : पश्चिम घाट ( नैसर्गिक)
🔥2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ( सांस्कृतिक)


✍️ संकलन :- ©चालुघडामोडी by Vivek 👑

Share This Article