📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १८ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- बुधवार
📙📘सुविचार :- सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात.
📙📘📙 दिनविशेष
🌍जागतिक दिवस
⚡ आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना
1271 : कुबलाई खानने युआन साम्राज्याचे नाव बदलले आणि राजवंशाची स्थापना केली.
1777 : युनायटेड स्टेट्समध्ये पहिला थँक्सगिव्हिंग साजरा करण्यात आला.
1935 : श्रीलंकेत लंका साम समाज पक्षाची स्थापना झाली.
1958 : जगातील पहिला संप्रेषण उपग्रह, प्रोजेक्ट स्कोर, प्रक्षेपित करण्यात आला.
1989 : सब्यसाची मुखर्जी यांनी भारताचे 20 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
1995 : अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी टांझानियाचे माजी राष्ट्रपती ज्युलियस नायरेरे यांना पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1999 : NASA ने टेरा प्लॅटफॉर्मवर पाच पृथ्वी निरीक्षण उपकरणे कक्षेत प्रक्षेपित केली, ज्यात ASTER, CERES, MISR, MODIS आणि MOPITT यांचा समावेश आहे.
2016 : भारतीय ज्युनियर हॉकी संघाने बेल्जियमचा पराभव करून ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला.
2022 : अर्जेंटिनाने 2022 फिफा विश्वचषक फायनल जिंकली
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1856 : ‘सर जे. जे. थॉमसन’ – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1940)
1878 : ‘जोसेफ स्टालिन’ – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 5 मार्च 1953)
1887 : ‘भिखारी ठाकूर’ – भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 1971)
1890 : ‘ई. एच. आर्मस्ट्राँग’ – एफ. एम. रेडिओचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 31 जानेवारी 1954)
1961 : ‘लालचंद राजपूत’ – माजी क्रिकेटपटू यांचा जन्म.
1963 : ‘ब्रॅड पिट’ – अमेरिकन अभिनेते व निर्माते यांचा जन्म.
1971 : ‘बरखा दत्त’ – पत्रकार यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1829 : ‘जीन बाप्टिस्टे लॅमार्क’ – फ्रेंच शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1744)
1993 : ‘राजा बारगीर’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
1995 : ‘कमलाकरबुवा औरंगाबादकर’ – राष्ट्रीय कीर्तनकार यांचे निधन.
2000 : ‘मुरलीधर गोपाळ गुळवणी’ – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचे निधन.
2004 : ‘विजय हजारे’ – भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचे निधन. (जन्म : 11 मार्च 1915)
🌍🖊️ जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन
दरवर्षी 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन साजरा केला जातो. हा दिवस स्थलांतरितांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. स्थलांतरित हे रोजगार, शिक्षण, सुरक्षितता, किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात आपले देश सोडून दुसऱ्या देशात जातात.स्थलांतरितांच्या कष्टांमुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. मात्र, त्यांना अनेकदा भेदभाव, शोषण, आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. हा दिवस त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.
संयुक्त राष्ट्रांनी 1990 साली स्थलांतरितांच्या हक्कांबाबत आंतरराष्ट्रीय करार संमत केला होता, ज्यामुळे त्यांना सुरक्षा आणि मानवी हक्क मिळवून देण्याची भूमिका ठरली.आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आपल्याला समज, सहकार्य, आणि मानवतेचा संदेश देतो. विविधतेचा सन्मान करताना स्थलांतरितांचे योगदान ओळखणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वांसाठी समानता आणि न्याय या मूल्यांवर आधारित एकत्रित समाज निर्माण करणे आवश्यक आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढयापुरताच असतो .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हात टेकणे – नाईलाज होणे, निरुपाय होणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 आई-वडील नसणारा – अनाथ
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
📝 बोधकथा 📝
स्वार्थी मांजर
एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.
तात्पर्य – स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.
📘 दिनांकानुसार पाढा :- १८ चा पाढा
१८ १०८
३६ १२६
५४ १४४
७२ १६२
९० १८०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝 प्रश्नावली 232 📝
प्रश्न १. झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या वाद्याशी निगडित होते ?
उत्तर :- तबला
प्रश्न २. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा डी गुणेश हा कितवा भारतीय ठरला ?
उत्तर : – दुसरा
प्रश्न ३. महाराष्ट्रातील हळदीचे सर्वात मोठे बाजारपेठ कोणती ?
उत्तर :- सांगली
प्रश्न ४. भारतात ‘ विजय दिवस ‘ केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- १६ डिसेंबर
प्रश्न ५. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता ?
उत्तर :- नागपूर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी.
एक देश एक निवडणूक बिला बाबत
⭐️लोकसभेत 17 डिसेंबर रोजी विधेयक सादर केलं गेलं
⭐️कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं
⭐️विधेयकाच्या बाजूने – 269 मते पडली
❌ विधेयकाच्या विरोधात – 198 मते पडली
◾️हे विधेयक आता संयुक्त सांसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे(Joint parliamentary committee-JPC)
◾️व्हीप असून पण BJP चे 20 खासदार गैरहजर होते
◾️या प्रक्रियेत वोटिंग करण्यासाठी पहिल्यांदाच EVM चा वापर केला गेला
➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥