📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २१ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- शनिवार
📙📘सुविचार :- चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 जागतिक दिन
⚡जागतिक ध्यान दिवस
⚡जागतिक बास्केटबॉल दिवस
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना
21 डिसेंबर : उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.
1891 : बास्केटबॉल पहिल्यांदा खेळला गेला
1909 :अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची गोळ्या घालून हत्या केली
1913 : आर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित झाले.
1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो 8 हे केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले गेले.
1986 : रघुनंदन स्वरूप पाठक यांनी भारताचे 18 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
1991 : सोव्हिएत युनियनचे विघटन : 11 सोव्हिएत प्रजासत्ताकांच्या नेत्यांनी अल्मा-अता प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली ज्याने कोसळलेल्या सोव्हिएत युनियनच्या जागी स्वतंत्र राष्ट्रांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
2020 : गुरू आणि शनीचा एक मोठा संयोग होतो, दोन ग्रह आकाशात 0.1 अंशांनी वेगळे झाले. 1623 पासून दोन ग्रहांमधील हा सर्वात जवळचा संयोग आहे
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1804 : ‘बेंजामिन डिझरेली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 1881)
1903 : ‘भालचंद्र दिगंबर गरवारे’ – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 2 नोव्हेंबर 1990)
1918 : ‘कुर्त वाल्ढहाईम’ – संयुक्त राष्ट्रांचे 4थे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 2007)
1921 : ‘पी. एन. भगवती’ – भारताचे 17 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
1932 : ‘यू.एन. अनंतमूर्ती’ – भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 2014)
1942 : ‘हू जिंताओ’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1950 : ‘जेफरी कॅझनबर्ग’ – ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक यांचा जन्म.
1954 : ‘ख्रिस एव्हर्ट लॉइड’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1959 : ‘कृष्णम्माचारी श्रीकांत’ – माजी क्रिकेट कप्तान यांचा जन्म.
1959 : ‘फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर’ – अमेरिकेची धावपटू यांचा जन्म. (मृत्यू : 21 सप्टेंबर 1998)
1963 : ‘गोविंदा’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
1966 : ‘राजीव बजाज’ – बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक यांचा जन्म.
1972 : ‘वाय. एस. जगनमोहन रेड्डी’ – आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
1989 : ‘तमन्ना भाटिया’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1824 : ‘जेम्स पार्किन्सन’ – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1755)
1963 : ‘जॅक हॉब्ज’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म : 16 डिसेंबर 1882)
1979 : ‘नरहर रघुनाथ फाटक’ – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1893)
1993 : ‘मल्हार रंगनाथ कुलकर्णी’ – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार यांचे निधन.
1997 : ‘निवृत्तीनाथ रावजी पाटील’ – भावगीतलेखक यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1914)
1997 : ‘पं. प्रभाशंकर गायकवाड’ – सनईवादक यांचे निधन.
2006 : ‘रूपमूर्त निझाव’ – तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1940)
🖊️🌍 जागतिक दिन लेख
जागतिक ध्यान दिवस
दरवर्षी 21 मे रोजी जागतिक ध्यान दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि आंतरिक शांतता साधण्यासाठी ध्यानाच्या महत्त्वावर भर देणे आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, दगदग, आणि चिंता यावर मात करण्यासाठी ध्यान हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.ध्यानामुळे मनःशांती, एकाग्रता, आणि मानसिक स्पष्टता वाढते. नियमित ध्यानाने केवळ मानसिक आरोग्य सुधारत नाही, तर शारीरिक आरोग्यालाही लाभ होतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे, आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे हे ध्यानाचे महत्त्वाचे फायदे आहेत.
जागतिक ध्यान दिवस हा दिवस व्यक्तींना ध्यानाचा सराव करण्याची प्रेरणा देतो. घरगुती किंवा सार्वजनिक जागांवर ध्यानाचे आयोजन करून अनेक लोक त्यामध्ये सहभागी होतात.ध्यान हा आत्मिक आणि मानसिक विकासाचा साधन असून, शांत, तणावमुक्त जीवनासाठी प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा. “ध्यान करा, आरोग्य राखा, आणि आनंदी जीवन जगा!”
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अजरामर होणे = कायम स्मरणात राहणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू – स्वदेशी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
🙏 प्रार्थना 🙏
उपकार
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो॥
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर।
चांदणे सुंदर पडे त्यांचे॥
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे।
किती गोड बरे गाणे गाती।।
सुंदर वेलींची सुंदर ही फुले।
तशी आम्ही मुले देवा तुझी॥
📝 बोधकथा 📝
प्रसंगाचे भान ठेवावे
एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.
👉 तात्पर्यः समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.
📘 दिनांकानुसार पाढा :- २१ चा पाढा
२१ १२६
४२ १४७
६३ १६८
८४ १८९
१०५ २१०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝प्रश्नावली २३५ 📝
प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर – राम शिंदे
प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत ?
उत्तर – राहूल नार्वेकर
प्रश्न.3) मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर – सुधीर रसाळ
प्रश्न.4) कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर – मुकेश थळी
प्रश्न.5) हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर – कवी गगन गिल
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
◾️जवाहरलाल नेहरू : पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार
◾️सरदार वल्लभभाई पटेल : उपपंतप्रधान, गृहमंत्री , माहिती आणि प्रसारण मंत्री
◾️मौलाना अबुल कलाम आझाद :शिक्षणमंत्री
◾️राजेंद्र प्रसाद :अन्न आणि कृषी मंत्री
◾️जॉन मथाई :अर्थमंत्री
◾️राजकुमारी अमृत कौर : आरोग्य मंत्री
◾️सरदार बलदेव सिंग : संरक्षण मंत्री
◾️जगजीवन राम : कामगार आणि पुनर्वसन मंत्री
◾️रफी अहमद किदवाई : दळणवळण मंत्री
◾️सि . राजगोपालाचारी : माहिती आणि प्रसारण मंत्री
◾️डॉ.बी.आर.आंबेडकर : कायदा मंत्री
◾️सरदार सुरजीत सिंग : रेल्वे मंत्री
◾️डॉ राजेंद्र प्रसाद : अन्न आणि कृषी मंत्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥