राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
5 Min Read
\"\"

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियानाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि.८- राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय. एस. चहल, विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव संजय सेठी, जलसंपदा विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसह, मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात व्यापक जनसहभाग वाढण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी. सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, वरळी सी लिंक, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरीक्त मुख्य सचिव श्री.खारगे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत सादरीकरण केले.

मंत्रिमंडळ निर्णय

सांस्कृतिक कार्य विभाग

*९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान*

*अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार*

९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल.

यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगर विकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील. 
या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील.  १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येईल.

हर घर तिरंगा बाबत सहसंचालकांचे पत्र

हर घर तिरंगा बाबत सहसंचालकांचे पत्र

प्रति,
१. विभागीय शिक्षण व उपसंचालक, सर्व विभाग,
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर)
६. प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा) सर्व,
७. शिक्षणप्रमुख (मनपा)

विषय – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने \”हर घर तिरंगा\” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.

संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. ०६/०८/२०२४

२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ०६/०८/२०२४ उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव अंतर्गत \”हर घर तिरंगा\” या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करावेत, याकरिता जिल्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे  तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगष्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळामध्ये झंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचना वा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.
  तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळांची संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या अशा स्वरूपात परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावा.

                               डॉ शोभा खंदारे
                 सहसंचालक राज्य  शैक्षणिक संशोधन
                         व प्रशिक्षण परिषद पुणे


      

\"\"
\"\"
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *