\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 172

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

              📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

         📙📘परिपाठ 📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २ सप्टेंबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :-  कष्टाला प्रामाणिकतेची जोड असली की हमखास यश मिळते

📙📘📙 दिनविशेष

🌍आजचा जागतिक दिन

🎗️ जागतिक नारळ दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

👉1916 : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
👉1920 : गांधींजी यांची ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
👉1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डॅनझिग शहर काबीज केले.
👉1945 : व्हिएतनामला जपान आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1946 : भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले.
👉1960 : केंद्रीय तिबेट प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
👉1970 : NASA ने चंद्रावरील अपोलो 15 आणि अपोलो 19 या दोन अपोलो मोहिमा रद्द केल्याची घोषणा केली.
👉1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
👉2008 : गुगलने त्याचा गुगल क्रोम वेब ब्राउझर लाँच केला
👉2023 : भारताची पहिली सौर निरीक्षण मोहीम, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1838 : ‘भक्तिविनाडो ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुन 1914)
➡️1853 : ‘विल्हेल्म ऑस्टवाल्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 22 सप्टेंबर 1956)
➡️1877 : ‘फेडरिक सॉडी’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
➡️1886 : ‘प्रा. श्रीपाद महादेव माटे’ – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1957)
➡️1924 : ‘डॅनियेल अराप मोई’ – केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
➡️1932 : ‘अर्नोल्ड ग्रीनबर्ग’ – स्नॅपल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑक्टोबर 2012)
➡️1941 : ‘साधना शिवदासानी’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
➡️1952 : ‘जिमी कॉनर्स’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
➡️1953 : ‘अहमदशाह मसूद’ – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2001)
➡️1965 : ‘पार्थो सेन गुप्ता’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
➡️1971 : ‘पवन कल्याण’ – भारतीय अभिनेते आणि राजकारणी यांचा जन्म.
➡️1988 : ‘इशांत शर्मा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
➡️1988 : ‘इश्मीत सिंग’ – भारतीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2008)


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

▶️1540 : ‘दावित (दुसरा)’ – इथियोपियाचा सम्राट यांचे निधन.
▶️1865 : ‘विल्यम रोवन हॅमिल्टन’ – आयरिश गणितज्ञ यांचे निधन.
▶️1937 : ‘पियरे डी कौर्तिन’ – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1863)
▶️1960 : ‘डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर’ – वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक यांचे निधन.
▶️1969 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 19 मे 1890)
▶️1976 : ‘वि. स. खांडेकर’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1898)
▶️1990 : ‘न. शे. पोहनेरकर’ – मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1907)
▶️1999 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचे निधन.
▶️2009 : ‘वाय. एस. राजशेखर रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन. (जन्म : 8 जुलै 1949)
▶️2011 : ‘श्रीनिवास खळे’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 30 एप्रिल 1926)
▶️2014 : ‘गोपाल निमाजी वाहनवती’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 7 मे 1949)
▶️2022 : ‘भक्कियाराज’ – भारतीय पार्श्वगायक यांचे निधन.  (जन्म : 31 ऑक्टोबर 1980)
▶️2022 : ‘टीवी शंकरनारायणन’ – दक्षिण भारतीय शास्त्रीय गायक  यांचे निधन.


✒️✒️  जागतिक दिन लेख

               🕐🌍 जागतिक नारळ दिन

जागतिक नारळ दिन दरवर्षी 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. नारळाच्या फळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि विविध उपयोग लक्षात घेऊन या दिवसाचे आयोजन केले जाते. नारळ हा फळ म्हणून खाण्यासाठी तसेच त्याच्या तेलासाठी प्रसिद्ध आहे. नारळाचे दूध, खोबरेल तेल, नारळाचे पाणी आणि खोबरं या सर्वांचा वापर अन्न शिजवण्यासाठी, सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी, आणि औषधी गुणधर्मांसाठी केला जातो.

जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये नारळ उत्पादन होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळते. विशेषतः भारत, फिलिपिन्स, इंडोनेशिया, आणि श्रीलंका हे नारळ उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत. नारळाच्या उत्पादनामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भर पडते.
             जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्यामुळे नारळाच्या शेतीविषयी जनजागृती होते. नारळाच्या विविध उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच, त्याच्या लागवडीच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आणि पर्यावरणास अनुकूल अशा पद्धतींचा अवलंब करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे आहे.
                 या विशेष दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नारळाच्या महत्वाला जागतिक पातळीवर ओळख देणे आणि नारळ उत्पादनात सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.


 

            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू

                     🙏 प्रार्थना 🙏
                
                    सत्यं शिवं सुंदरा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।। धृ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतिरी दयासागरा ।। २ ।।

होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ।। ३ ।।

                        📝 बोधकथा 📝
                               
                    वाईट सवयींचा त्याग

एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन.

त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला.मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,\’ आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.\” मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणेलक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.

तात्पर्य – वाईट सवयी बाळवण्यापूर्वीच त्यांचे निर्मूलन केले पाहिजे

                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- २ चा पाढा

                                  २           १२
                                  ४           १४
                                  ६           १६
                                  ८           १८
                                  १०         २०
🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🌍🌍
   

               📋 प्रश्नावली १७२ 📋



प्रश्न १. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर :- अहमदाबाद

प्रश्न २. भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात ?
उत्तर :- इंदिरा पॉईंट

प्रश्न ३. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रासबिहारी बोस

प्रश्न ४. जालियनवाला बाग मध्ये निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले ?
उत्तर :- जनरल डायर

प्रश्न ५. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956  आली  बौद्ध धर्म कोणत्या ठिकाणी स्वीकारला ?
उत्तर :- नागपूर

🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🕐🌍🌍🌍

👉 आपल्या माहितीसाठी

🟠ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती

🔹सर्वात मोठा ग्रह – गुरु

🔸सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह-  बुध

🔹पर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस

🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन –  बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून

🔹सर्वात प्रकाशमान ग्रह – शुक्र

🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह –  मंगळ

🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह – शुक्र.

🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह – युरेनस

🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह – गुरु

🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह – शुक्र

🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह –  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने – गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.

🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम –  शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *