फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटी
गेल्या काही दिवसापासून राज्य शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत आहेत. एक नोव्हेंबर 2005 पासून पुढे नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने डीसीपीएस व त्यानंतर एनपीएस या योजना आणल्या. योजना फसव्या असून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना तुटपुंज निवृत्ती वेतन मिळते असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात शासनाने फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युईटी जुन्या पेन्शन प्रमाणे देऊ अशी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केलेली होती. त्यानुसार दिनांक 31 2023 रोजी शासनाने परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केलेली आहे.
त्यामुळे आता एखादा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास जुन्या पेन्शन प्रमाणे त्याला फॅमिली पेन्शन मिळेल व निवृत्त झाल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेमध्ये ज्याप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळते त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 2005 नंतर मध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी मिळेल. सदरील शासन निर्णय खाली तुम्हाला पाहायला मिलेळ.