राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतूद वगळणेबाबत.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
०६ फेब्रुवारी, २०२४.
वाचा :-
१) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन, दि.०४ फेब्रुवारी, २०१६.
२) शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन, दि. ११ ऑगस्ट, २०१७.
शासन निर्णय :-
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन, दि.०४ फेब्रुवारी, २०१६ मधील परिच्छेद क्र.९ मध्ये “प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवा निवृत्तीसाठी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही,” ही तरतूद वगळण्यात येत आहे.
२.
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/ विमा प्रशासन, दि. ११ ऑगस्ट, २०१७ मधील परिच्छेद क्र.१२ मध्ये “माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही.” ही तरतूद वगळण्यात येत आहे.
३.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२०६१६५१४७२१०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
( वि. रं. दहिफळे ) सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति, – संचालक,विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
प्रत :- १) मा. राज्यपालांचे सचिव
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३) मा. वित्तमंत्री यांचे सचिव / प्रधान सचिव
४) सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
५) सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६) सर्व संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य
७) महालेखापाल (लेखा परीक्षा) – १ महाराष्ट्र, मुंबई ८) महालेखापाल (लेखा परीक्षा) – २ महाराष्ट्र, नागपूर
शासन निर्णय क्रमांकः विमासं-२०२३/प्र.क्र.६४ / विमा प्रशासन
९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) – १ महाराष्ट्र, मुंबई
१०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) – २ महाराष्ट्र, नागपूर
११) महालेखापाल (लेखा परीक्षा-३), महाराष्ट्र, मुंबई
१२) महालेखापाल, स्थानिक संस्था, लेखापरीक्षा व लेखे, मुंबई
१३) वरिष्ठ महालेखापाल, स्थानिक संस्था (लेखा परीक्षा व लेखे), नागपूर
१४) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१५) चालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
१६) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१७) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१८) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१९) सर्व उप कोषागार अधिकारी
२०) मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव
२१) मंत्रालयातील सर्व विभाग,
२२) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२३) मंत्रालयातील सर्व विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
२४) सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मंबई
२५) सचिव, राज्य निवडणूक आयोग.
२६) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (ळ ३ खा,) मुंबई
२७) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपाल शाखा), मुंबई
२८) प्रबंधक लोक आयक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मुंबई
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉 Click here for pdf