मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय!Cabinet Decisions.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*

👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :*

✅ बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

✅ बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

✅ एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी

✅ मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार

✅ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

✅ जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

✅ राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

✅ एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

✅ विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

✅ राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

✅अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

✅ डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

✅ मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

✅ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

✅ उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

✅ ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

✅ आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

✅ राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

✅ राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता

Share This Article
3 Comments
  • चांगले निर्णय झाले. त्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन ! 💐💐💐
    परंतु स्वत: घोषित केल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री जी यांनी१ नोव्हेंबर पूर्वी नियुक्त पण त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या २६००० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला असता तर अधिक बरे झाले असते.
    साहेब, आम्ही चातकासारखी वाट बघत आहोत. आज हा निर्णय होईलच असे वाटत होते. आमची व आमच्या कुटुंबाची एवढा आशीर्वाद घ्या साहेब..
    आमची मने व मतेच काय.. तर कायम आपल्या नावाची इतिहास देखील नोंद करेल ! ही आपणास विनंती सुद्धा आहे. 🙏🙏

  • 2005पूर्वी नियुक्त मात्र 2005 नंतर अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना मिळावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *