मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय. दि.16.03.2024

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय!CABINET DECISIONS.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*

👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :*

✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला

✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता. 

✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार

✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण

✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना

✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान

✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर

✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *