जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मार्च 2023 मध्ये झालेल्या संपामध्ये समन्वय समितीला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिनांक 9 मे 2023 रोजी जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीचे निमंत्रण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्वेसर्वा श्री संभाजी तात्या थोरात यांना दिलेले आहे.
ही बैठक कक्ष क्रमांक – 5 सातवा मजला मुख्य इमारत मंत्रालय या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 9 मे 2023 रोजी 6.30 वाजता ही बैठक होणार आहे.