आपले नविन काढलेले किंवा जुने आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे ?
आपण जर नवीन आधार कार्ड काढले असेल किंवा आपले जुने हरवलेले आधार कार्ड पाहिजे असेल तर https://myaadhaar.uidai.gov.in/downloadAadhaar या साईट वरून तुम्ही डाऊनलोड करू शकता.यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप वापरू शकता.
➡️ पण यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे.
▶️ स्टेप्स
1.https://myaadhaar.uidai.gov.in/downloadAadhaar या लिंकवर क्लिक करा.
2.लिंक वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो दिसेल.
वरील विंडो दिसल्यानंतर Login वर क्लिक करा.
3.लॉगिन वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.त्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी UID नंबर टाकावा लागेल.त्याखाली CAPTCHA टाकून SEND OTP या बटणावर क्लिक करावे.त्यानंतर तुमच्या मोबाईल वर 6 अंकी OTP येईल तो तुम्हाला त्याखाली टाकावा लागेल आणि LOGIN करावे लागेल.
4.लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील विंडो दिसेल त्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल.त्याखालील download या ऑप्शन वर क्लिक करा.तुमचे आधार कार्ड डाऊनलोड झालेलं असेल.
5.आधार कार्ड डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड फाईल प्रोटेक्टेड असल्यामुळे पासवर्ड म्हणून तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे कॅपिटल आणि जन्मतारखेचे वर्ष टाकावे लागेल.
उदा.तुमचे नाव गणेश असेल आणि तुमचे जन्मतारखेचे वर्ष 1990 असेल तर तुमचा पासवर्ड होईल – GANE1990.
अशा प्रकारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाउनलोड करता येईल.