प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका !
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका !
विनाअट बदली प्रक्रिया राबवा; शिक्षक सहकार संघटनेची मागणी
सोलापूर : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका अशी मागणी करीत विनाअट बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे सोमवारी देण्यात आले.
जिल्हा परिषदेकडून १४ मार्च रोजी प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी पत्र काढण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या बदली प्रक्रिया राबविण्याबाबतच्या ११ मार्च २०२४ च्या पत्रानुसार, शिक्षक बदल्याबाबत २१ जून २०२३ च्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती द्यावी असे म्हटले आहे.
ही नियुक्ती देताना सेवेची अट किती असावी याबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली नाही. त्यानुसार बदली इच्छुक सर्वांना संधी मिळावी म्हणजे सर्व शिक्षक बदलीपात्र होतील असेही निवेदनात म्हटले आहे.