विद्यार्थी प्रमोट करणे, ट्रान्सफर करणे (Out of School, transfer request approve, attach request approve, New student entry), इत्यादी कामे पूर्ण करावी. ३० सप्टेंबर २०२४ नंतर या सुविधा काही कालावधी साठी बंद करण्यात येणार
📌 शाळांसाठी नवीन सूचना
1) सर्व शाळेचे मुख्याध्यापकांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त विद्यार्थी प्रमोट करणे, ट्रान्सफर करणे (Out of School, transfer request approve, attach request approve, New student entry), इत्यादी कामे पूर्ण करावी. ३० सप्टेंबर २०२४ नंतर या सुविधा काही कालावधी साठी बंद करण्यात येणार आहेत तरीही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
2) सन २०२४-२५ ची संच मान्यता करतांना ३० सप्टेंबर २०२४ अखेरची स्टुडन्ट पोर्टल वरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे, तरी सर्व शाळेचे मुख्याध्यापकांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त विद्यार्थी प्रमोट करणे, ट्रान्सफर करणे (Out of School, transfer request approve, attach request approve), इत्यादी कामे पूर्ण करावी. त्यानंतर विद्यार्थी संख्येत झालेला बदल सन २०२४-२५ ची संच मान्यता करतांना विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
3) सर्व शाळेचे मुख्याध्यापक / केंद्र प्रमुख /गट शिक्षण अधिकारी / शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक)/ शिक्षण उपसंचालक / शिक्षण संचालक व इतर सर्व users यांचे विद्यार्थी पोर्टल लॉगिन पासवर्ड रीसेट करण्यात आले आहेत, तसेच ६० दिवसांची कालावधी नंतर पासवर्ड रीसेट करणे अनिवार्य राहील. पाबाबत “Your Password has been expired. Please reset your Password”. अशी सूचना प्राप्त होईल, त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रीसेट करून स्टुडन्ट पोर्टलचा वापर करता येईल.
4) शेक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करता प्रमोशन सुरु करण्यात आले आहे.
5) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्यांचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२४-२५ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.
📌 शाळांसाठी नियमित सूचना.
1) एखाद्या शाळेने Attach, ट्रान्सफर, ट्रान्सफर (आऊट ऑफ स्कूल) या Option द्वारे Request केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी विहीत मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर Request ५२ दिवसानंतर रद्द करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांची शाळा नव्याने Request टाकू शकते.
2) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणे आवश्यक आहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.
3) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल.
4) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.
5) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिन्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील.