मुख्यालयी राहण्यापासून शिक्षकांची लवकरच सुटका – दीपक केसरकर
अहमदनगर : मुख्यालयी राहण्याची सक्ती शिक्षकांवर करू नये, याबाबत मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनच शिक्षकांकडून केली जात होती. शासनाने यावर सकारात्मक पाऊल उचलले असून मुख्यालयी निवासाच्या अटीमुळे कोणाही शिक्षकावर कारवाई केली जाणार नाही. ती अट कायमचीच रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
शनिवारी (दि. २४) नगरमध्ये कल्याण रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. त्यावेळी मंत्री केसरकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून सुमारे तीन हजारांहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजी थोरात, डॉ. संजय कळमकर, रावसाहेब रोहोकले, आबासाहेब
कळमकर, रोहोकले यांची निवड
शिक्षकांकडून संयम शिकलो : सुजय विखे पाटील.
शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात व खासदार सुजय विखे यांची भाषणे चर्चेचा विषय ठरली. यावेळी संभाजी थोरात म्हणाले, पूर्वी गुरुजी मुलांना क, ख, ग याचे धडे द्यायचे. आता शिक्षक ‘क’ रे कमळाचा शिकवतात.
त्यांचे प्रश्न जो सोडवेल त्या नेत्याचा फायदा होतो, अन्यथा काय तो निर्णय घ्यायचा यासाठी ते स्वतंत्र असतात. यावर सुजय विखे म्हणाले, मी पूर्वी आक्रमक होतो; परंतु आता शिक्षकांमुळे संयम बाळगायला शिकलो आहे.
मुख्यालयाच्या अटीबाबत आणि एमएससीआयटी परीक्षेबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षकांनी मुख्यालयाच्या अटीबाबत काळजी करू नये. कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही. एमएससीआयटी परीक्षेबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. ही परीक्षा न दिल्याने एकाही शिक्षकाचा पगार कपात होणार नाही; परंतु या अटीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.
खासदार विखे म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहोत. इतर प्रश्नही त्यांच्याशी चर्चा करून सोडवले जातील.
कळमकर यांनी माहिती अधिकारात काहीजण मुख्यालयाच्या प्रश्नावरून शिक्षकांना कोंडीत पकडतात. काहीजण ब्लॅकमेल करतात, याकडे लक्ष वेधले. आपसी बदल्यांबाबत निर्णय घेतल्यास शिक्षकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले