📌 घोषवाक्य, सेल्फी अपलोड व वाचन प्रतिज्ञा ऑनलाईन नोंदणी करणेबाबत.
प्रति,
सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक (सर्व व्यवस्थापन व माध्यम)
💢 मा. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार, जालना जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची घोषवाक्य अपलोड, सेल्फी अपलोड व वाचन प्रतिज्ञा पुढील ऑनलाईन लिंकवर नोंदणी करावयाची आहे. एकाच लिंकवर या तिनही बाबी नोंदविण्याची सुविधा आहे.
👉 https://mahacmletter.in/
🌟 उत्कृष्ट घोषवाक्य व सेल्फी असलेल्या विद्यार्थी, त्याचे कुटुंबातील सदस्य व वर्ग शिक्षक यांना *मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत स्नेहभोजनाची संधी* मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आपले घोषवाक्य व सेल्फी कल्पक असावी.
💢राज्यशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार, उद्या दि. 19 फेब्रुवारी 24 रोजी शाळास्तरावर शिवजयंती निमित्त पालक मेळावा आयोजित करण्यात यावा. शिवजयंती उत्सव साजरा केल्यानंतर संबंधित नोंदणी पालकांच्या मोबाईलवरून तेथेच पूर्ण करून घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची वैयक्तिक नोंद होईल.
👉 *यासंबंधी महत्वपूर्ण निर्देश:*
1) शिक्षण या विषयावरील घोषवाक्य (10 शब्द मर्यादा) कागदावर पेनाने लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. तसेच ते घोषवाक्य टाईप करून तेथे सबमीट करावे.
2) मा. मुख्यमंत्री यांच्या पत्रासह विद्यार्थी व पालक यांचा सेल्फी अपलोड करावा.
3) पोर्टलवरील वाचन प्रतिज्ञामध्ये स्वतःचे नाव टाकून ती प्रतिज्ञा सबमीट करावी.
👉प्रत्येकवेळी *Congratulations* असा संदेश येईल. तीन वेळेस असा संदेश येईल.
💢महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते.
💢वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत.
💢आपण सर्वांनी वरील लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदविण्यास राज्य शासनाच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे.
Dist buldana tq chikhli at post kelwad
घोष वाक्य सेल्फी अपलोड व वाचन प्रतिज्ञा ऑनलाइन नोदंणी करणेबाबत
My school And my teachers is Nice
Study is my life
Study is my glob