प्रति.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद (सर्व)
विषय: नैसर्गिक आपत्ती कारणांमुळे (unprecedented reasons such as Heat waves, Fluids, Rain, Cold waves, Fog etc) बंद असलेल्या शाळांची माहिती सादर करण्याबाबत
संदर्भ: श्री. विपिन कुमार, अतिरिक्त सचिव (SS-II), DOSEL यांचे संदेशानुसार
वरील विषयाबाबत संदर्भाधीन प्राप्त संदेशानुसार विहित नमुन्यातील माहिती उदया दिनांक ०८.१०.२०२४ रोजी सादर करावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे शाळा बंद आहेत याची माहितो द्यावयाची आहे. त्यामध्ये शाळा बंद असलेली कारणे उष्णतेच्या लाटा, पूर, पाऊस, थंडीच्या लाटा, धुके किंवा इतर कारणांमुळे याचा समावेश करावा.
त्यानुसार आपल्या जिल्हयाची माहिती आजच खाली नमूद केलेल्या तक्त्यामध्ये सादर करावी. जेणेकरुन संकलीत माहिती शासनास सादर करणे शक्य होईल.