संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉटवर नोंदविणे करिता ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत*.
*प्रति,*
१) विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व)
२) उपसंचालक, प्रादेशिक
विद्याप्रधिकरण (सर्व)
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था(सर्व)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक,
माध्यमिक),सर्व
५) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/
दक्षिण/ पश्चिम
६) प्रशासन अधिकारी (म.न. पा., न.
पा.,न. प.),सर्व
*विषय- संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉटवर नोंदविणे करिता ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत*.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत (विद्या समीक्षा केंद्र) (VSK) लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे,सदर गुण कशा पद्धतीने भरायचे याबाबत यूट्यूब वर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.सदर यु-ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यासाठी राज्यातील इयत्ता ३ री ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी यू ट्यूब लिंकला *दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००* या कालावधीत जॉईन व्हावे.
https://www.youtube.com/watch?v=xnnTpdMylxY
SCERT मधील विद्या समीक्षा (VSK), केंद्रामार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन – २ (PAT-३)गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावर संकलित मूल्यमापन – २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.तरी आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे.
(शरद गोसावी)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
संकलित चाचणी 2