प्रति,
१. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी,
२. सर्व लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी* (* जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेमार्फत )
विषयः- लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मतदान विषयक अहवालाबाबत.
संदर्भ :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४६४/INST/PDM/२०२३/EPS दिनांक २० एप्रिल, २०२४.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २० एप्रिल. २०२४. च्या पत्रान्वये निवडणूकीच्या दिवशी तसेच त्यालगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने पाठवावयाच्या प्रमाणपत्राचे मसूदे आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे व त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवावयाचे आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरिता हस्त पुस्तिका २०२३ मधील परिच्छेद १३.६५ येथे नमूद केल्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी १.०० वाजता, संध्याकाळी ७.०० वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता जोडपत्र २९ (Annexure-29) मध्ये सविस्तर अहवाल पाठवावयाचा आहे. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी प्रत्येक २ तासाने मतदानाची एकत्रित (Cumulative) टक्केवारी दर्शविणारा अहवाल सर्व लोकसभा मतदार संघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त. ईव्हिएम-व्हिव्हिपॅट संदर्भातील अहवाल सुद्धा विहित विवरणपत्रात विहित वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सबब, खालील वेळापत्रकाप्रमाणे संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या सहीने अहवाल पाठविण्यात यावेत.
लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मतदान विषयक अहवालाबाबत.Polling day timetable
Leave a comment