📖 वाचाल तर वाचाल 📖
📙📘परिपाठ📘📙
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ५ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- तुम्ही घेतलेला कोणताच निर्णय चुकीचा नसतो,परंतु तो बरोबर आहे हे सिद्द करून दाखवावा लागतो.
📙📘📙 दिनविशेष.
✒️✒️ आजचा जागतिक दिन
आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
👉1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
👉1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
👉1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
👉1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
👉1994 : इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
👉1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
👉1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
▶️1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
▶️1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
▶️1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
▶️1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
▶️1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
▶️1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
▶️1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
▶️1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
➡️1962 : ‘मेरिलीन मन्रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
➡️1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
➡️1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
➡️1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
➡️1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
➡️2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
➡️2001 : ‘ज्योत्स्ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
➡️2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)
🌍 🌍 जागतिक दिन लेख 🌍🌍
🕐 आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन 🕐
आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन हा दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट वाहतूक व्यवस्थेतील सिग्नलचे महत्त्व आणि त्यांच्या कार्यक्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. वाहतूक सिग्नल हे रस्ते सुरक्षेचा एक महत्वाचा घटक आहेत. ते वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचे मार्गदर्शन करतात.
पहिल्या वाहतूक सिग्नलचा वापर 1868 मध्ये लंडन येथे करण्यात आला होता. आज, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिग्नल अधिक प्रभावी आणि स्मार्ट बनवले गेले आहेत. वाहतूक सिग्नल विविध रंगांच्या दिव्यांचा वापर करतात – लाल थांबण्याचा संकेत देतो, हिरवा मार्ग मोकळा असल्याचा, तर पिवळा सावधगिरीचा इशारा देतो.
आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिनाच्या निमित्ताने, विविध शाळा, कॉलेज, आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, सिग्नलचे योग्य वापर कसे करावे, आणि रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती यावर भर दिला जातो.
या दिवसाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि सिग्नलच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षितपणे प्रवास करण्याची प्रतिज्ञा करावी. रस्ते सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि वाहतूक सिग्नलचा योग्य वापर करून आपण ती सुनिश्चित करू शकतो. आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन आपल्याला या महत्त्वपूर्ण घटकाची आठवण करून देतो.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
🙏 प्रार्थना
🎗️ खरा तो एकची धर्म 🎗️
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे.
कवी : साने गुरुजी
🕐📝 बोधकथा 📝🕐
कबूतर आणि शिकारी
एका जंगलामध्ये खूप सारे कबूतर एकत्र राहात होते. एका शिकाऱ्यांना या जंगलामध्ये राहणाऱ्या कबुतरांची चाहूल झाली व त्याने या कबुतराला पकडण्यासाठी एक युक्ती केली. शिकारी आणि कबूतर राहणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये जाळी घातले व त्या जाळांमध्ये डाळींबाचे बी अंथरले. तेथे एक कबुतरांचा थवा आला व त्या थव्यातील कबूतरांनी केवळ डाळिंबी चे बी पाहिले व ते बी खाण्यासाठी कबुतरखाने जाळ्यावर झेप घेता सर्व कबूतर जाळ्यामध्ये अडकले.
तेव्हा सर्व कबुतरांच्या लक्षात आले की आपण एखाद्या शिकाऱ्याच्या कावडी मध्ये सापडला त्या आजारातून सुटका करण्यासाठी एक एक कबूतर बळ मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागली पण एकाही कबुतराला जाळ्यातून सुटका करता आली नाही. सर्व कबूतर हा तास झाले व त्यांना वाटले की आता आपण शिकार होणार तेवढा कबुतराच्या थव्यातील एक म्हातारे कबूतर पुढे आले व सर्व कबुतरांना सांगत ते म्हणाले, \” एकट्याच्या बलाने हे जाळ उडणे अतिशय कठीण आहे परंतु सर्व कबुतराने एकसाथ मिळून ताकद लावली तर आपण हे सर्व जाळे घेऊन पडू शकतो.\”
म्हाताऱ्या कबुतरा चे बोलणे सर्व कबुतरांचा लक्षात आले व सर्वांनी एक साथ मिळून ताकत लावताच जाळे उडाले व सर्व कबूतर जाळ्यात सोबत पळून गेले अशा प्रकारे सर्व कबुतरांची शिकाऱ्याच्या हातातून सुटका झाली.
तात्पर्यः कोणतेही काम एकीने केले तर त्यात यश मिळतेच.
( एकीचे बळ मिळते फळ )
📘 दिनांकानुसार पाढा – ५ चा पाढा
५ ३०
१० ३५
१५ ४०
२० ४५
२५ ५०
📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋
🛑 प्रश्नावली १५१ 🛑
प्रश्न १. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर :- अ जीवनसत्व
प्रश्न २. कलर ब्लाइंडनेस हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या दोन रंगांमध्ये फरक करू शकत नाही ?
उत्तर :- लाल आणि हिरवा.
प्रश्न ३. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा ही वास्तू कोणाच्या काळात बांधली गेली ?
उत्तर :- बाजीराव पेशवे.
प्रश्न ४. तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणते मूलद्रव्य असते ?
उत्तर :- पारा
प्रश्न ५. पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते ?
उत्तर :- ४ अंश सेल्सिअस
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
👉🚩 आपल्या माहितीसाठी
वेगवेगळे आजार
🛑 विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖