📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📙 परिपाठ 📙📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ७ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- बुधवार
📙📘सुविचार :- “दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”
📙📘📙 दिनविशेष.
✒️✒️ आजचा जागतिक दिन
🎗️ राष्ट्रीय हातमाग दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1789 : यूएस सरकारच्या युद्ध विभागाची स्थापना झाली.
👉1942 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्य पॅसिफिक महासागरातील ग्वाडालकॅनल कालव्यावर उतरले आणि द्वितीय विश्वयुद्धातील सर्वात भयंकर लढाई खेळली गेली. या घटनेपासून जपानची माघार सुरू झाली.
😊1947 : मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली.
👉1947 : थोर हेयरडाहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोन टिकी नावाच्या बाल्सा वुड राफ्टमधून 101 दिवसांत प्रशांत महासागर ओलांडून 7,000 किमी प्रवास केला.
👉1981 : वॉशिंग्टन स्टार वृत्तपत्र सलग 128 वर्षांच्या प्रकाशनानंतर बंद झाले.
😊1985 : ताकाओ डोई, मोमोरू मोहोरी आणि चिकी मुकाई यांची जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून निवड झाली.
😊1987 : लिन कॉक्स अमेरिकेतून सोव्हिएत युनियनमध्ये पोहणारी पहिली व्यक्ती ठरली.
👉1990 : आखाती युद्धासाठी अमेरिकेचे पहिले सैन्य सौदी अरेबियात आले.
👉1991 : पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
👉1997 : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावावर असलेला व्हिटोरियो डी सिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
😊2000 : ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संकल्प मोडवालने नऊ वर्षांखालील गटात संयुक्त विजेतेपद पटकावले.
👉2020 : एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 ने भारतातील केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ओव्हरशूट केली आणि क्रॅश झाला, त्यात 190 पैकी 21 जणांचा मृत्यू झाला.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
➡️1702 : ‘नसीरुद्दीन मुहम्मद शाह’ – मुघल सम्राट जन्म
➡️1871 : ‘अवनींद्रनाथ टागोर’ – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1951)
➡️1876 : ‘माता हारी’ – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1917)
➡️1912 : ‘केशवराव कृष्णराव दाते’ – हृदयरोगतज्ञ यांचा जन्म.
➡️1925 : ‘एम. एस. स्वामीनाथन’ – पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री यांचा जन्म.
➡️1935 : ‘राजमोहन गांधी’ – भारतीय चरित्रकार, इतिहासकार, महात्मा गांधींचे नातू यांचा जन्म.
➡️1936 : ‘डॉ. आनंद कर्वे’ – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते यांचा जन्म.
➡️1948 : ‘ग्रेग चॅपेल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
➡️1966 : ‘जिमी वेल्स’ – विकिपीडियाचे सह-संस्थापक यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1934 : ‘जोसेफ मॅरी जाकॉर्ड’ – जॅक्वार्ड लूम चे शोधक यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1752)
▶️1848 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 ऑगस्ट 1779)
▶️1941 : ‘रवींद्रनाथ टागोर’ – भारतीय कवी, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म : 7 मे 1861)
▶️1974 : ‘अंजनीबाई मालपेकर’ – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन.
▶️2018 : ‘एम.करुणानिधी’ – तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष यांचे निधन.
🌍 🌍 जागतिक दिन लेख 🌍🌍
राष्ट्रीय हातमाग दिन
राष्ट्रीय हातमाग दिन हा दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी हातमाग उद्योगातील परंपरा, शिल्पकला आणि कुशलतेला मान्यता देण्यासाठी साजरा केला जातो. भारताच्या विविध राज्यांमध्ये हातमागाची परंपरा खूप जुनी आहे आणि ती त्यांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. हा दिवस हातमाग उद्योगातील शिल्पकारांच्या योगदानाची कदर करतो आणि त्यांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देतो.
7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीने देशी उद्योगांना आणि विशेषतः हातमाग विणकरांना प्रोत्साहन दिले होते. 2015 मध्ये, भारत सरकारने दरवर्षी 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, प्रदर्शनं आणि कार्यशाळांचं आयोजन केलं जातं, ज्यामुळे लोकांना हातमाग उद्योगाची माहिती मिळते आणि ते यामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळते. हातमाग उद्योगातून तयार झालेली उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या दिवशी हातमाग उद्योगाच्या विकासासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय हातमाग दिन हा एक विशेष पर्व आहे जो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याचे प्रतिक आहे.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 थोडक्यात समाधान मानणारा – असंतुष्ट
🙏 प्रार्थना 🙏
ए मलिक तेरे बंदे हम
ऐ मालिक तेरे बन्दे हम…. ऐसे हों हमारे करम….. नेकी पर चले और बदी से ले,…… ताकी हँसते हुए निकले दम……. ऐ मालिक तेरे बंदे हम…….
ये अंधेरा घना छा रहा, तेरा इंसान घबरा रहा। हो रहा बेख़बर, कुछ ना आता नज़र, सुख का सूरज छिपा जा रहा। है तेरी रोशनी में जो दम, वो अमावस को कर दे पूनम। नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……….
बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों हैं इस में कमी। पर तू जो खड़ा, है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी। दिया तूने हमें जब जनम, तू ही ले लेगा हम सब के ग़म। नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……..
जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। वो बुराई करें, हम भलाई करे, न ही बदले की हो भावना। बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिटे बैर का ये भरम।
नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुये निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम…. ..
🕐📝 बोधकथा 📝🕐
गरुड आणि घुबड
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिकांची पिल्ले खायचे नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का . तुला माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील. अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाले खरंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही. यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात. या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील.
पुढे एक दिवस गरुड तरी चा शोधत निघतो. एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात. विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील. पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती. यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत. त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते. तू त्या पक्षांना फत्ते करतो.
घुबड त्या ढोली जवळ येतात त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते.
यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही. यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती. म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही.
तात्पर्य-स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.
📘 दिनांकानुसार पाढा :- ७ चा पाढा
७ ४२
१४ ४९
२१ ५६
२८ ६३
३५ ७०
🕐📝🕐📝🕐📝🕐📝📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝
🛑 प्रश्नावली १५३ 🛑
प्रश्न १. देशातील कायदे निर्माण करणारी सर्वोच्च संस्था कोणती ?
उत्तर :- संसद
प्रश्न २. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा केला ?
उत्तर :- हुतात्मा दिन.
प्रश्न ३. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय ?
उत्तर :- परिभ्रमण.
प्रश्न ४. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?
उत्तर :- ७४६
प्रश्न ५. बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर :- छत्रपती संभाजी नगर.
प्रश्न ६. संत गोरोबाकाका कुंभार यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर :- तेर ( धाराशिव जिल्हा )
प्रश्न ७. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर :- १७ सप्टेंबर.
प्रश्न ८. महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ?
उत्तर :- महापौर.
प्रश्न ९. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय
उत्तर :- प्रास्ताविक.
प्रश्न १०. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर :- बंकिमचंद्र चटर्जी.
📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝📋
👉 आपल्या माहितीसाठी.
महाराष्ट्रातील 38 भौगोलिक कृषी मानांकने.
◾️डहाणू घोलवड चिकू : पालघर जिल्हा
◾️बहाडोली जांभूळ : पालघर
◾️जांभूळ : बदलापूर (ठाणे)
◾️पांढरा कांदा : अलिबाग (रायगड)
◾️काजू : (वेंगुर्ला )सिंधुदुर्ग
◾️कोकम : रत्नागिरी सिंधुदुर्ग
◾️कोकण हापूस : रत्नागिरी
◾️अंजीर : पुरंदर (पुणे)
◾️आंबेमोहर तांदुळ : पुणे
◾️डाळिंब : सोलापूर
◾️ज्वारी : (मंगळवेढा) सोलापूर
◾️अजरा घनसाळ राईस : कोल्हापूर
◾️गुळ : कोल्हापूर
◾️बेदाणा : सांगली
◾️स्ट्रॉबेरी : महाबळेश्वर (सातारा)
◾️द्राक्ष : नाशिक
◾️व्हॅली वाईन : नाशिक
◾️लासलगाव कांदा : नाशिक
◾️केळी : जळगाव
◾️भरीत वांगी : जळगाव
◾️आमचूर : नवापूर (नंदुरबार)
◾️मिरची : नंदुरबार
◾️मोसंबी : जालना
◾️दगडी ज्वारी : जालना
◾️सिताफळ : बीड
◾️मराठवाडा केसर : छत्रपति संभाजीनगर
◾️चिंचोली चिंच : लातूर
◾️चालुघडामोडी : 2024
◾️बोरसुरी डाळ : लातूर
◾️काष्टी कोथिंबीर : लातूर
◾️कुंथलगिरी खवा : धाराशिव
◾️बसमत हळद : हिंगोली
◾️सांगली हळद : सांगली
◾️वायगाव हळद : वर्धा
◾️लाल मिरची :भिवपुरी (नागपुर)
◾️चिन्नोर भात : भंडारा
◾️संत्री : नागपूर
भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये 38 कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे.