📖 वाचाल तर वाचाल 📖
📙📘परिपाठ📘📙
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १२ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- मानवाचा सर्वांगीण विकास घडविते तेच खरे शिक्षण
📙📘📙 दिनविशेष.
✒️✒️ आजचा जागतिक दिन
🌍 जागतिक युवा दिन
🌍 जागतिक हत्ती दिवस
आजचा दिनविशेष – घटना
👉1851 : आयझॅक सिंगरला शिलाई मशीनचे पेटंट मिळाले.
👉1883 : शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
👉1920 : शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
👉1922 : राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास 4 वर्षांनी त्यांनी लिहिलेले राजसंन्यास हे नाटक पहिल्यांदा सादर झाले.
👉1942 : चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, 2 ठार 16 जखमी.
👉1948 : लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले.
👉1950 : अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
👉1952 : मॉस्कोमध्ये 13 ज्यू विद्वानांची हत्या.
👉1953 : पहिल्या थर्मोन्यूक्लियर बॉम्बची चाचणी घेण्यात आली.
👉1960 : नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 1ए चे यशस्वी प्रक्षेपण.
👉1964 : वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले.
👉1977 : श्रीलंकेत जातीय दंगलीत 300 हून अधिक तमिळ मारले गेले.
👉1981 : आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
👉1982 : परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
👉1989 : कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पहिले जागतिक मराठी संमेलन सुरू झाले.
👉1990 : स्यू हेंड्रिक्सनला दक्षिण डकोटामध्ये सर्वात मोठा आणि संपूर्ण टायरानोसॉरस रेक्स हाडांचा सापळा सापडला.
👉1995 : यूएसएच्या मायकेल जॉन्सनने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटर आणि 400 मीटर या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष धावपटू ठरला आहे.
👉1998 : सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर.
👉2000 : प्रसिद्ध पर्यावरणवादी मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
👉2002 : 2 वर्षे आणि 7 महिन्यांचा, युक्रेनियन खेळाडू सेर्गेई करजाकिन जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला.
👉2005 : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
▶️1801 : ‘जॉन कॅडबरी’ – ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 मे 1889)
▶️1860 : ‘क्लारा हिटलर’ – एडॉल्फ हिटलरची आई यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 1907)
▶️1880 : ‘बाळकृष्ण गणेश खापर्डे’ – चरित्रकार,वाड्मयविवेचक यांचा जन्म.
▶️1881 : ‘सेसिल डी मिल’ – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1959)
▶️1887 : ‘आयर्विन श्रॉडिंगर’ – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1961)
▶️1906 : ‘शंकरराव पांडुरंगराव थोरात’ – लेफ्टनंट जनरल यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 1992)
▶️1910 : ‘यूसुफ बिन इशक’ – सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 23 नोव्हेंबर 1970)
▶️1914 : ‘तेजी बच्चन’ – समाजसेविका, प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आई यांचा जन्म.
▶️1919 : ‘डॉ. विक्रम साराभाई’ – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1971)
▶️1925 : ‘नॉरिस मॅक्विहिर’ – गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक यांचा जन्म.
▶️1926 : ‘बी. आर. खेडकर’ – गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार यांचा जन्म.
▶️1948 : ‘फकिरा मुंजाजी शिंदे’ – कवी, समीक्षक व अनुवादक यांचा जन्म.
▶️1959 : ‘प्रवीण ठिपसे’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.
▶️1995 : ‘सारा अली खान’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1964 : ‘इयान फ्लेमिंग’ – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक यांचे निधन. (जन्म : 28 मे 1908)
➡️1968 : ‘बाळशास्त्री व्यंकटेश हरदास’ – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य यांचे निधन.
➡️1973 : ‘दयानंद बाळकृष्ण बांदोडकर’ – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1911)
➡️1982 : ‘हेन्री फोंडा’ – अमेरिकन अभिनेते यांचे निधन. (जन्म : 16 मे 1905)
➡️1984 : ‘आनंदीबाई जयवंत’ – कवी, समीक्षक व अनुवादक यांचे निधन.
➡️2005 : ‘लक्ष्मण कादिरमगार’ – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1932)
🌍 🌍 जागतिक दिन लेख 🌍🌍
जागतिक युवा दिन
जागतिक युवा दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांच्या भूमिका, त्यांचे महत्त्व, आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो. युवा हे समाजाचा भविष्य आहेत, आणि त्यांच्या सामर्थ्य, जोश, आणि कल्पकता हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक युवा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात कार्यशाळा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि युवा नेतृत्व विकास कार्यक्रमांचा समावेश असतो. या उपक्रमांद्वारे तरुणांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या, आणि समाजातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून दिली जाते.
या दिनानिमित्त, तरुणांच्या समस्यांवर चर्चा केली जाते. शिक्षण, रोजगार, मानसिक आरोग्य, आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच, तरुणांच्या आवाजाला महत्त्व देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले जातात. युवा हे समाजाचे शक्तिस्थान आहेत, आणि त्यांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जागतिक युवा दिन हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व ओळखून त्याचे योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे.
🌍 जागतिक हत्ती दिवस 🌍
जागतिक हत्ती दिवस हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश हत्तींविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे आहे. हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे स्थलचर प्राणी आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात.
हत्तींना त्यांच्या प्राकृत वासस्थानामध्ये असलेल्या धोके, जसे की वनतोड, शिकारी आणि मानवी-हत्ती संघर्ष यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जागतिक हत्ती दिवस हा लोकांना हत्तींविषयी शिक्षित करण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो.
या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात, जसे की हत्तीच्या संवर्धनावर व्याख्याने, माहितीपर प्रदर्शन, शैक्षणिक कार्यशाळा आणि फिल्म शो. यामुळे लोकांमध्ये हत्तींच्या जीवनाविषयी आणि त्यांच्यावरील संकटांविषयी जागरूकता निर्माण होते.
हत्तींच्या संवर्धनासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटना कार्यरत आहेत. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलांचे संरक्षण, शिकारी विरोधी उपाययोजना आणि मानवी-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जातात.
जागतिक हत्ती दिवस हा आपल्या सर्वांसाठी हत्तींविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. हत्तींचे संरक्षण हे आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अन्नास जागणे – केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 गावच्या कामकाजाची जागा – चावडी
🙏 प्रार्थना 🙏
हीच अमुची प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
🕐📝 बोधकथा 📝🕐
कोल्हा आणि कोंबडी
एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’
तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
📘 दिनांकानुसार पाढा :- १२ चा पाढा
१२ ७२
२४ ८४
३६ ९६
४८ १०८
६० १२०
🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝🕐📝
🌹प्रश्नावली १५७🌹
प्रस्न १.वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
उत्तर :- सुर्यप्रकाश
प्रश्न २.विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर :- टंगस्टन
प्रश्न ३.सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो?
उत्तर:- 8 मिनिटे 20 सेकंद
प्रश्न ४.गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर :- न्यूटन
प्रश्न ५. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर :- सूर्य
प्रश्न ६. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे
उत्तर :- नायट्रोजन
प्रश्न ७. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो?
उत्तर :- कार्बन डाय ऑक्साईड
प्रश्न ८. विमानाचा शोध कोणी लावला?
उत्तर :- राईट बंधू
प्रश्न ९. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर :- पांढ-या पेशी
प्रश्न १०. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
उत्तर :- मांडीचे हाड
📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋
👉 आपल्या माहितीसाठी
पॅरिस ऑलिम्पिक 2024.
भारत एकूण 6 पदके
(1 रौप्य ,5 कास्य)
🚔 एक 1 रौप्य पदक
१) नीरज चोप्रा अथेलेटिक (हरियाणा)
🚔 5 कांस्य पदक
१)मनु भाकर. नेमबाजी (हरियाणा)
२)सरबजोत सिंग आणि मनु भाकर मिक्स नेमबाजी (हरियाणा)
३)स्वप्नील कुसळे नेमबाजी (महाराष्ट्र)
४)भारतीय खेळाडू (हॉकी संघ)
५)अमन सेहरावत कुस्तीपटू (हरियाणा)