\”ज्ञानाची वारी आली आपल्या दरी.\” प्रश्नावली १६२. Prashnavali 162.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
11 Min Read

      📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

       📙📘परिपाठ 📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २१ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- बुधवार

📙📘सुविचार :- जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.


📙📘📙 दिनविशेष

🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ आंतरराष्ट्रीय स्मरण दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

▶️1718 : तुर्की आणि व्हेनिस यांच्यात शांतता करार झाला.
▶️1842 : तस्मानियामध्ये होबार्ट शहराची स्थापना झाली.
▶️1888 : विल्यम बरोज यांनी बेरीज करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
▶️1911 :  : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
▶️1944 : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या योजनांबाबत अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
▶️1959 : हवाई हे अमेरिकेचे पन्नासावे राज्य बनले.
▶️1972 : वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 भारतात मंजूर झाला
▶️1988 :  6.9 मेगावॅट तीव्रतेने नेपाळ भूकंपाने नेपाळ-भारत सीमेवर भूकंप, अनेक लोक ठार आणि हजारो जखमी झाले.
▶️1991 : लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
▶️1993 : मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
▶️2022 : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान 50 लोक मरण पावले.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1765 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 20 जून 1837)
➡️1871 : ‘गोपाळ कृष्ण देवधर’ – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1935)
➡️1789 : ‘ऑगस्टिन कॉशी’ – फ्रेन्च गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1857)
➡️1905 : ‘बिपीन गुप्ता’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1981)
➡️1907 : ‘पी. जीवनवंश’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 18 जानेवारी 1965)
➡️1909 : ‘नागोराव घन :श्याम देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2000)
➡️1910 : ‘नारायण बेन्द्रे’ – जगप्रसिद्ध चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 फेब्रुवारी 1992)
➡️1924 : ‘श्रीपाद दाभोळकर’ – गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 30 एप्रिल 2001)
➡️1934 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2001)
➡️1939 : ‘फेस्टस मोगे’ – बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
➡️1961 : ‘व्ही. बी. चन्द्रशेखर’ – भारताचा फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
➡️1963 : ‘मोहम्मद (सहावा)’ – मोरोक्कोचा राजा यांचा जन्म.
➡️1973 : ‘सर्गेइ ब्रिन’ – गूगल चे सहसंस्थापक यांचा जन्म.
➡️1981 : ‘कॅमेरॉन विंकल्वॉस’ – कनेक्ट्यू चे सहसंस्थापक यांचा जन्म.
➡️1986 : ‘उसेन बोल्ट’ – जमैकाचा धावपटू यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1931 : ‘पं. विष्णू दिगंबर’ – पलुसकर संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य यांचे निधन. (जन्म : 18 ऑगस्ट 1872)
👉1940 : ‘लिऑन ट्रॉट्स्की’ – रशियन क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 7 नोव्हेंबर 1879)
👉1947 : ‘इटोर बुगाटी’ – बुगाटी कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1881)
👉1976 : ‘पांडुरंग नाईक’ – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर यांचे निधन. (जन्म : 13 डिसेंबर 1899)
👉1978 : ‘विनू मांकड’ – भारतीय क्रिकेट खेळाडू याचं निधन. (जन्म : 12 एप्रिल 1917)
👉1981 : ‘काकासाहेब कालेलकर’ – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ याचं निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1885 – सातारा, महाराष्ट्र)
👉1991 : ‘गोपीनाथ मोहंती’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 20 एप्रिल 1914)
👉1995 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1910)
👉2000 : ‘निर्मला गांधी’ – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा यांचे निधन.
👉2000 : ‘विनायकराव कुलकर्णी’ – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत यांचे निधन.
👉2001 : ‘शरद तळवलकर’ – मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते यांचे निधन. (जन्म : 1 नोव्हेंबर 1921)
👉2001 : ‘शं. ना. अंधृटकर’ – मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले यांचे निधन.
👉2004 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय उडिया भाषा कवी यांचे निधन. (जन्म : 13 मे 1916)
👉2006 : ‘बिस्मिला खान’ – भारतरत्न ख्यातनाम सनईवादक यांचे निधन. (जन्म : 21 मार्च 1916)

🌍🌍 जागतिक दिन लेख :

           🌍 आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली
         हा दिवस दहशतवादामुळे पीडित झालेल्या लोकांच्या दु:खावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या वेदना आणि दुःख यांना या दिवसाद्वारे मान्यता दिली जाते.
      दहशतवादाचा परिणाम केवळ पीडितांवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबांवर, मित्रांवर आणि समाजावरही होतो. दहशतवादाचे पाश जगभर पसरले असून, विविध देशांमध्ये असंख्य लोकांना याचा फटका बसला आहे. पीडितांचे हक्क आणि त्यांच्या गरजा ओळखणे आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
        संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना केली असून, या निमित्ताने जगभरातील लोकांना पीडितांच्या साहाय्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी, हा दिवस जागतिक एकता आणि समर्थनाचे प्रतीक मानला जातो.

                   🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉   आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉    अक्षय असणे = चिरंजीव असणे

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट

                     🙏 प्रार्थना 🙏

             या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।

आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥

शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।

शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
                    
                      📖 बोधकथा 📖

                          निर्मळता
              गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,\”गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल.\” गुरुजी म्हणाले,\” अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर.\” शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,\”वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये.\”

तात्पर्य- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.                                                                                                             
📘 दिनांकानुसार पाढा :- २१ चा पाढा

                                  २१           १२६
                                  ४२           १४७
                                  ६३           १६८
                                  ८४           १८९
                                  १०५         २१०

🕐📋🕐📋🕐📋🕐📋📋🕐📋🕐📋🕐📋📋🕐📋🕐📋🕐📋📋🕐📋



   

                  📝 प्रश्नावली १६२ 📝

प्रश्न १. राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?
उत्तर :- राष्ट्रपती

प्रश्न २. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?
उत्तर :- 7 ते 17

प्रश्न ३.  ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?
उत्तर :- ग्रामसेवक

प्रश्न ४. तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?
उत्तर :- सज्जा / साजा

प्रश्न ५. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
उत्तर :- पोलीस पाटील

प्रश्न ६. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?
उत्तर :- 15 ऑगस्ट 1947

प्रश्न ७. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर :- वासुदेव बळवंत फडके

प्रश्न ८.आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- सुभाषचंद्र बोस

प्रश्न ९. संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?
उत्तर :- 1929 (लाहोरच्या सत्रात)

प्रश्न १०. दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?
उत्तर :- पंतप्रधान

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

👉 आपल्या माहितीसाठी.

         विद्यापीठ- जिल्हा – स्थापना वर्ष 

◾️मुंबई विद्यापीठ  18 जुलै 1857

◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर
📌 स्थापना-4 ऑगस्ट 1923

◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई
📌 स्थापना   – 1916

◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे
📌 स्थापना  1949

◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर  – 23 ऑगस्ट 1958

◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर  –
📌 स्थापना – 18 नोव्हेंबर 1962

◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज  विद्यापीठ,अमरावती
📌 स्थापना – 1 मे 1983

◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक
📌 स्थापना – जुलै 1989

◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
📌 स्थापना – 15 ऑगस्ट 1989

◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड
📌 स्थापना –  17 सप्टेंबर 1994

◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली –
📌 स्थापना- 27 सप्टेंबर 2011

◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर 
📌 स्थापना : 1 ऑगस्ट 2004

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *