\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 165

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 165

                  📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

        📙📘परिपाठ📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २४ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- शनिवार

📙📘सुविचार :-  चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही.

📙📘📙 दिनविशेष

✒️✒️. आजचा जागतिक दिन :
 
🪕🎸 आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस


✒️✒️  आजचा दिनविशेष – घटना

👉1608 : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे आला.
👉1690 : कोलकाता शहराची स्थापना.
👉1875 : कॅप्टन मॅथ्यू वेब हे इंग्लिश बे पोहणारे पहिले व्यक्ती बनले.
👉1891 : थॉमस अल्वा एडिसनने मोशन पिक्चर कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
👉1950 : एडिथ सॅम्पसन संयुक्त राष्ट्रातील पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी बनल्या.
👉1936 : ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार झाला.
👉1966 : रशियाची लुना-11 मानवरहित मोहीम चंद्रावर.
👉1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
👉1968 : फ्रांसने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला.
👉1991 : युक्रेनला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1995 : मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ऑपरेटिंग सिस्टम जारी केली.
👉2006 : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने प्लूटो हा ग्रह नसल्याचा निर्णय घेतला.

✒️✒️  आजचा दिनविशेष – जन्म

▶️1833 : ‘नर्मदाशंकर दवे’ – गुजराथी लेखक समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1886)
▶️1872 : ‘न. चिं. केळकर’ – केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1947)
▶️1880 : ‘बहिणाबाई चौधरी’ – निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1951)
▶️1888 : ‘बाळ गंगाधर खेर’ – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 8 मार्च 1957)
▶️1888 : ‘वेलेंटाइन बेकर’ – मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1942)
▶️1908 : ‘शिवराम हरी राजगुरू’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)
▶️1917 : ‘पं. बसवराज राजगुरू’ – किराणा घराण्याचे गायक यांचा जन्म.
▶️1918 : ‘सिकंदर बख्त’ – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 23 फेब्रुवारी 2004)
▶️1927 : ‘हॅरी मार्कोवित्झ’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1927 : ‘अंजली देवी’ – भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या यांचा जन्म.
▶️1929 : ‘यासर अराफत’ – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 2004)
▶️1932 : ‘रावसाहेब जाधव’ – व्यासंगी साहित्यसमीक्षक यांचा जन्म.
▶️1944 : ‘संयुक्ता पाणिग्रही’ – ओडीसी नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू : 24 जून 1997)
▶️1945 : ‘विन्स मॅकमेहन’ – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक यांचा जन्म.
▶️1947 : ‘पाउलो कोएलो’ – ब्राझीलियन लेखक यांचा जन्म.


✒️✒️  आजचा दिनविशेष – मृत्यू

➡️1925 : ‘सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर’ – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1837)
➡️1967 : ‘हेन्री जे. कैसर’ – कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1882)
➡️1993 : ‘दि. ब. देवधर’ – क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1892)
➡️2000 : ‘कल्याणजी वीरजी शहा’ – कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचे निधन. (जन्म : 30 जून 1928)
➡️2008 : ‘वै वै’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार यांचे निधन.
➡️2019 : ‘अरुण जेटली’ – भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1952)


          🌍 आजचे जागतिक दिवस 🌍

🪕🎸 आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस

आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस (International Strange Music Day) दरवर्षी 24 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना संगीतातील विविध प्रकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. संगीतातील विचित्र, अनोख्या किंवा अपरिचित शैलींवर लक्ष केंद्रीत करणे आणि त्याचा आनंद घेणे यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

या दिवसाची संकल्पना न्यूयॉर्कमधील संगीतकार आणि निर्माता पॅट्रिक ग्रॅंट यांनी 1998 साली मांडली. त्यांचा विचार असा होता की, लोकांनी त्यांच्या नेहमीच्या संगीतातून बाहेर पडून नवीन आणि अपरिचित संगीत शोधून ऐकावे. हे संगीत वेगळे आणि कधीही ऐकले नसले तरीही, त्यात एक अनोखी ऊर्जा असते जी आपल्याला नवीन अनुभव देऊ शकते.

आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस विविध संगीत प्रकारांशी लोकांचे नाते मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मकता वाढवण्यासाठी एक उत्तम साधन ठरतो. या दिवशी संगीतप्रेमी वेगवेगळ्या शैलींमध्ये प्रयोग करतात, ज्यामुळे त्यांच्या संगीताच्या आवडी विस्तृत होतात. एकूणच, या दिवसाचा संदेश असा आहे की, संगीताचे कोणतेही रूप असो, ते अनुभवायला घ्या आणि त्यातून नवीन आनंद शोधा.
             

            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 नदीची सुरुवात होते ते ठिकाण – उगम
             
                     🙏 प्रार्थना 🙏

                    इतनी शक्ती हमे देना दाता

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना
हम चले नेक रस्ते में हम से, भुल कर भी कोई भूल हो ना॥धृ॥

दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमे ज्ञान की रोशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन मे बदले की हो ना।
हम चले नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥१॥

हम ना सोचे हमे क्या मिला, हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फुल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन भी बन जाये मधुबन।
अपनी करुणा जल तू बहा के, कर दे पावन हर-एक मन का कोना।
हम चले नेक रस्ते में हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥२॥ 


                        📝 बोधकथा 📝

                          विश्‍वासाला तडा
एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’

तात्‍पर्यः- गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.
                                                                                                     
📘 दिनांकानुसार पाढा :- २४ चा पाढा

                                  २४           १४४
                                  ४८           १६८
                                  ७२           १९२
                                  ९६           २१६
                                  १२०         २४०

📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝



   

              🛑 प्रश्नावली १६५ 🛑

प्रश्न १. कोणत्या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखली जाते ?
उत्तर :- तापी

प्रश्न २. महाराष्ट्रातील पहिला कारखाना कोठे आहे ?
उत्तर :- प्रवरानगर

प्रश्न ३. मराठवाडा आणि खानदेश या दोन भागांना जोडण्याचे काम कोणता घाट करतो ?
उत्तर :- औट्रम घाट

प्रश्न ४. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे ?
उत्तर :- रत्नागिरी

प्रश्न ५. \’सुंदरबन\’ हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे ?
उत्तर :- पश्चिम बंगाल.

प्रश्न ६. पर्वतीय मृदेत ——- मृदा म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- अपरिपक्व मृदा

प्रश्न ७. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
उत्तर :- विषुववृत्त

प्रश्न ८. हिराकुड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- ओडिशा

प्रश्न ९. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या घरात आढळतो ?
उत्तर :- स्थितांबर

प्रश्न १०. महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे ?
उत्तर :-  ४८

🌍📝🌍🌍📝🌍📝🌍📝🌍🌍📝🌍📝🌍📝🌍🌍📝🌍📝🌍🌍📝🌍

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *