📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ६ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- • आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️ राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1522 : व्हिक्टोरिया, जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज, फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेत स्पेनला पोहोचले.
👉1888 : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात 250 क्रिकेट विकेट्सचा विक्रम.
👉1939 : दुसरे महायुद्ध – दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
👉1952 : कॅनडाचे पहिले टेलिव्हिजन स्टेशन मॉन्ट्रियलमध्ये उघडले.
👉1965 : पहिले भारत-पाक युद्ध सुरू झाले.
👉1966 : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेंड्रिक व्हेरवॉर्ड यांची संसदेत हत्या करण्यात आली.
👉1968 : स्वाझीलँड स्वतंत्र देश झाला.
👉1993 : कुसुमाग्रजा प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची निवड.
👉1997 : सरोदवादक अमजद अली खान यांना यूएस नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप देण्यात आली.
👉2003 : महमूद अब्बास यांनी पॅलेस्टिनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
▶️1766 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 जुलै 1844)
▶️1889 : ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू यांचा जन्म. (मृत्यू : 20 फेब्रुवारी 1950)
▶️1892 : ‘सर एडवर्ड ऍपलटन’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1901 : ‘कमलाबाई रघुनाथ गोखले’ – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 1997)
▶️1921 : ‘नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड’ – बार-कोड चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2012)
▶️1923 : ‘पीटर (दुसरा)’ – युगोस्लाव्हियाचे राजा यांचा जन्म.
▶️1929 : ‘यश जोहर’ – हिंदी चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 26 जून 2004)
▶️1937 : ‘जनरल शंकर रॉयचौधरी’ – भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख यांचा जन्म.
▶️1949 : ‘राकेश रोशन’ – बॉलिवूडमधील निर्माता, निर्देशक यांचा जन्म.
▶️1957 : ‘जोशे सॉक्रेटिस’ – पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1968 : ‘सईद अन्वर’ – पाकिस्तानी फलंदाज यांचा जन्म.
▶️1971 : ‘देवांग गांधी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1938 : ‘सली प्रुडहॉम’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक यांचे निधन.
➡️1963 : ‘मंजेश्वर गोविंद पै’ – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1883)
➡️1972 : ‘अल्लाउद्दीन खाँ’ – जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार यांचे निधन.
➡️1990 : ‘लेन हटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 23 जून 1916)
➡️2007 : ‘लुसियानो पाव्हारॉटी’ – इटालियन ऑपेरा गायक यांचे निधन.
🌍 जागतिक दिन लेख 🌍
📖 राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन 📖
राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन हा दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश वाचनाच्या महत्त्वाला ओळख देणे आणि लोकांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. वाचनामुळे माणसाच्या ज्ञानात वाढ होते, विचारशक्ती वाढते आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपली सृजनशीलता अधिक प्रखर होते. आजच्या डिजिटल युगात, लोकांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप जास्त असतो, पण पुस्तक वाचनाचं महत्त्व मात्र कमी होत चाललं आहे.
नॅशनल पुस्तक वाचन दिन निमित्ताने, आपण स्वतःला आणि इतरांना एक पुस्तक वाचण्याचं आवाहन करू शकतो. यातून केवळ माहितीच मिळत नाही तर आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती, विचारधारा, आणि अनुभवांशी जोडले जातं. वाचनामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, आणि मानसिक तणाव कमी होतो.
या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या मित्र-परिवारात वाचनाची सवय रुजवू शकतो. एका नवीन पुस्तकाच्या प्रवासात उतरून त्यातलं ज्ञान, अनुभव, आणि आनंद घेऊ शकतो. या दिवशी आपल्याला वाचनाची ताकद अनुभवता येईल आणि आपलं जीवन अधिक समृद्ध बनवता येईल.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सहसा न घडणारे – क्वचित
🙏 प्रार्थना 🙏
प्रार्थना
हे शारदे माँ- हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे। हर शब्द तेरा, ये हर गीत तुझसे ।। हम हैं अकेले, हम हैं अधूरे। तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ। हे शारदे माँ
मुनियों ने समझी, गुणियों ने जानी। वेदों की भाषा, पुराणों की वाणी।। हम भी तो समझें, हम भी तो जानें। विद्या का हमको तू अधिकार दे माँ।। हे शारदे माँ
तू श्वेतवर्णी कमल पे विराजे। हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे।। मन से हमारे मिटा दो अँधेरे। उजालों का हमको तू संसार दे माँ।। हे शारदे माँ
📝 बोधकथा 📝
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,\’\’ बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे\’\’ विनोबाजी म्हणाले,\’\’ मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची\’\’ मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,\’\’ मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.\’\’
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
📘 दिनांकानुसार पाढा :- ५ चा पाढा
६ ३६
१२ ४२
१८ ४८
२४ ५४
३० ६०
📘📙📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📙📘📙📘📙📘
📝 प्रश्नावली १७६ 📝
प्रश्न १. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते ?
उत्तर- डेसिबल
प्रश्न २. नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कार रेसिंग
प्रश्न ३. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर – मध्य प्रदेश
प्रश्न ४. विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात ?
उत्तर – एंपियर
प्रश्न ५. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला ?
उत्तर – लोकमान्य टिळक
📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘
👉 आपल्या माहितीसाठी
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा.
⭕️ रत्नागिरी 237 km
⭕️ रायगड 122 km
⭕️ सिंधुदुर्ग 120 km
⭕️ बृहन्मुंबई 114 km
⭕️ पालघर 102 km
⭕️ ठाणे 25 km
महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्रकिनारा 720
━━━━━━༺༻━━━━━━
भारतातील राज्यांना लाभलेला समुद्रकिनारा.
✍गुजरात – 1600km
✍तामिळनाडू – 1076km
✍आंध्र प्रदेश – 972km
✍महाराष्ट्र – 720km
✍केरळ – 580km
✍ओडिशा – 480km
✍कर्नाटक – 320km
✍पश्चिम बंगाल -158km
✍गोवा – 101
✍अंदमान निकोबार – 1962km
✍लक्षद्वीप – 132km
✍पदुचरी- 31km
भारताला लाभलेला समुद्रकिनारा – 7517km
🙏पसायदान 🙏
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||