📖 वाचाल तर वाचाल 📖
📘परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १९ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार
📙📘सुविचार :- धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️ वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
➡️1893 : न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
➡️1957 : अमेरिकेने पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली.
➡️1959 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील डिस्नेलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
➡️1983 : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
➡️1991 : इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्समध्ये ओत्झी आइसमन सापडला.
➡️2000 : सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
➡️2001 : गांधीवादी विचारवंत डॉ. जमनालाल बजाज पुरस्कार सतीश कुमार यांना जाहीर.
➡️2007 : युवराज सिंग टी-20 क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला.
➡️2010 : डीपवॉटर होरायझन तेल गळतीमध्ये गळती होणारी तेल विहीर बंद करण्यात आली.
➡️2022 : युनायटेड किंगडमच्या राणी एलिझाबेथ II चे शासकीय अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर ॲबे, लंडन येथे पार पडले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1867 : ‘श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 31 जुलै 1968)
▶️1911 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 1993)
▶️1912 : ‘रुबेन डेव्हीड’ – भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1989)
▶️1917 : ‘अनंतराव कुलकर्णी’ – कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1998)
▶️1925 : ‘बाबूराव गोखले’ – निर्माते व नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 1981)
▶️1958 : ‘लकी अली’ – गायक, अभिनेता व गीतलेखक यांचा जन्म.
▶️1965 : ‘सुनिता विल्यम’ – भारतीय-अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
▶️1977 : ‘आकाश चोप्रा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1925 : ‘सर फ्रान्सिस डार्विन’ – इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक यांचे निधन.
👉1936 : ‘पं. विष्णू नारायण भातखंडे’ – हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1860)
👉1963 : ‘सर डेव्हिड लो’ – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1891)
👉1987 : ‘एनर गेरहर्देसन’ – नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 10 मे 1897)
🙏1992 : ‘ना. रा. शेंडे’ – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष यांचे निधन.
👉1993 : ‘दिनशा के. मेहता’ – म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी यांचे निधन.
👉2002 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1954)
👉2004 : ‘दमयंती जोशी’ – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1928)
🙏2007 : ‘दत्ता डावजेकर’ – मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1917)
🌍🌍जागतिक दिन लेख
वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Wales International Film Festival) हा वेल्समध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट जागतिक पातळीवरील चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणणे व त्यांचे कार्य सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. विविध श्रेणींमध्ये चित्रपट सादर केले जातात, जसे की लघुपट, माहितीपट, फिचर फिल्म्स इत्यादी.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक एकत्र येतात, ज्यातून कला आणि सर्जनशीलतेचे आदानप्रदान घडते. वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित नाही, तर चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन देखील केले जाते.
वेल्समधील चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचे आणि सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य हा महोत्सव करतो.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आठ हात लाकुड, नऊ हात धलपी – एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 दात ओठ खाणे – चीड व्यक्त करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
🙏 प्रार्थना 🙏
सारे जहाँ से अच्छा
सारे जहाँ से अच्छा हिंदोसताँ हमारा
हम बुलबुले हैं इसकी यह गुलिस्ता हमारा॥
परबत वो सबसे उँचा, हमसाया आसमाँ का।
वह संतरी हमारा, वह पासबाँ हमारा॥१॥
गोदी मे खेलती है, जिसकी हजारों नदियाँ।
गुलशन है जिनके दम से रक्शे जिनाँ हमारा ॥२॥
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना।
हिंदी है हम, वतन है हिन्दोस्ताँ हमारा ॥४॥
जहाँ से…
📝 बोधकथा 📝
सत्तेचा सुविनियोग
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारीबाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता. पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू. पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,”भाऊ !! तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत.” कंडक्टर हसून म्हणाला,”महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?” पुजारीबाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला,” महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.” एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,” प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.
तात्पर्य – मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागते.
📘 दिनांकानुसार पाढा :- १९ चा पाढा
१९ ११४
३८ १३३
५७ १५२
७६ १७१
९५ १९०
🌍🌍🕐🌍🌍🕐🕐🌍🕐🌍🕐🕐🌍🕐🌍🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍
📝 प्रश्नावली १८२ 📝
प्रश्न १. कोणत्या पोलीस चौकीवर हल्ला झाल्यामुळे असहकार चळवळ थांबवण्यात आली होती ?
उत्तर :- चौरीचौरा.
प्रश्न २. स्वराज्य,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतु:सुत्री कोणी मांडली ?
उत्तर :- लोकमान्य टिळक.
प्रश्न ३. वास्को-द-गामा चे भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले ?
उत्तर :- कालिकत
प्रश्न ४. भारतीय लष्करातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
उत्तर :- परमवीर चक्र
प्रश्न ५. भारतात ‘देशबंधू’ म्हणून कोणाला ओळखले जात होते ?
उत्तर :- चित्तरंजन दास
📙📙📋📙📋📙📋📙📋📙📋📙📋📙📙📋📋📙📋📙📋📙📋📙📋
👉आपल्या माहितीसाठी.
राष्ट्रीय आंदोलनातील महत्वाच्या घटना.
► 1904 ➖ भारतीय विद्यापीठ कायदा पारित
► 1905 ➖ बंगालचे विभाजन
► 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना
► 1907 ➖ सुरत अधिवेशन, काँग्रेसमध्ये फूट
► 1909 ➖ मार्ले-मिंटो सुधारणा
► 1911 ➖ ब्रिटिश सम्राटाचा दिल्ली दरबार
► 1916 ➖ होमरूल लीगची स्थापना
► 1916 ➖ मुस्लिम लीग-काँग्रेस समझोता (लखनऊ पॅक्ट)
► 1917 ➖ महात्मा गांधींनी चंपारण मध्ये आंदोलन
► 1919 ➖ रौलट कायदा
► 1919 ➖ जलियांवाला बाग हत्याकांड
► 1919 ➖ मोंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा
► 1920 ➖ खिलाफत आंदोलन
► 1920 ➖ असहकार आंदोलन
► 1922 ➖ चौरी-चौरा घटना
► 1927 ➖ सायमन कमिशनची नियुक्ती
► 1928 ➖ सायमन कमिशनचे भारत आगमन
► 1929 ➖ भगतसिंगांनी केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला
► 1929 ➖ काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली
► 1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन
► 1930 ➖ पहिले गोलमेज परिषद
► 1931 ➖ दुसरे गोलमेज परिषद
► 1932 ➖ तिसरे गोलमेज परिषद
► 1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणालीची घोषणा
► 1932 ➖ पुणे समझोता
► 1942 ➖ भारत छोडो आंदोलन
► 1942 ➖ क्रिप्स मिशनचे आगमन
► 1943 ➖ आझाद हिंद फौजेची स्थापना
► 1946 ➖ कॅबिनेट मिशनचे आगमन
► 1946 ➖ भारतीय संविधान सभेची निवडणूक
► 1946 ➖ अंतरिम सरकारची स्थापना
► 1947 ➖ भारताच्या विभाजनाची माउंटबॅटन योजना
► 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती