“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 189

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

        📖 वाचाल तर वाचाल 📖

   📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २८ सप्टेंबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- शनिवार

📙📘सुविचार :-  भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.


📙📘📙 दिनविशेष

🌍🌍आजचा जागतिक दिन

🎗️ माहितीच्या सार्वत्रिक वापराचा आंतरराष्ट्रीय दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

➡️1924 : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
➡️1928 : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
➡️1939 : दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
➡️1999 : आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
➡️2000 : नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.
➡️2008 : स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन 1 हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.


✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

▶️1898 : ‘शंकर रामचंद्र दाते’ – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार यांचा जन्म.
▶️1907 : ‘भगत सिंग’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)
▶️1909 : ‘पी. जयराज’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 2000)
▶️1929 : ‘लता मंगेशकर’ – जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा जन्म.
▶️1947 : ‘शेख हसीना’ – बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1966 : ‘पुरी जगन्नाथ’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.
▶️1982 : ‘अभिनव बिंद्रा’ – ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म.
▶️1982 : ‘रणबीर कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1895 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 डिसेंबर 1822)
👉1992 : ‘ग. स. ठोसर’ – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर यांचे निधन.
👉1994 : ‘के. ए. थांगवेलू’ – भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1917)
👉2000 : ‘श्रीधरपंत दाते’ – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन.
👉2004 : ‘डॉ. मुल्कराज आनंद’ – इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1905)
👉2012 : ‘एम. एस. शिंदे’ – चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यांचे निधन.
👉2012 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1928)


     🌍 जागतिक दिन लेख

     माहितीच्या सार्वत्रिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
माहितीच्या सार्वत्रिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळवण्याचा हक्क आणि त्याच्या महत्वावर जागरूकता वाढवणे आहे. या दिवसाचा प्रारंभ युनेस्कोने 2015 मध्ये केला, ज्यामुळे लोकांना सरकारी आणि सार्वजनिक माहिती मिळवण्याचे अधिकार सुनिश्चित केले जातात. माहिती मिळवण्याचा हक्क हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो नागरिकांना त्यांच्या सरकारांशी संवाद साधण्याची आणि जबाबदारी विचारण्याची संधी देतो.
या दिवसाचे महत्त्व विशेषतः विकसनशील देशांमध्ये आणि वंचित समुदायांमध्ये अधिक असते, कारण माहितीचा प्रवेश सामाजिक विकास, सुशासन, आणि पारदर्शकतेला चालना देतो. डिजिटल युगात, माहितीचा प्रवेश केवळ छापील माध्यमांपुरता मर्यादित नसून, इंटरनेटच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे, सर्वांना माहितीचा प्रवेश देणे म्हणजे समानता, न्याय, आणि शाश्वत विकासाला चालना देणे होय.

======££££====££££====££££====££££====      
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  अटकेपार झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम गाजवणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 वाटेल तसा  पैसा खर्च करणे – उधळपट्टी

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

         नमो भास्करा

नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा मनाचा कराया विकास

गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश

नमो शारदा मी तुझा नम्र दास
अशी बुद्धी देई मला तुचि खास

घडो मायभूमी अहर्निश सेवा
मनाला अहंकार कधी ना शिवावा।

                                                                
                     📝 बोधकथा 📝

                      गरीब शेतकरी

एक गरीब शेतकरी होता. त्याचा कडे कसन्यासाठी थोडीच जमीन होती. त्या जमिनीत तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते. कमी जमीन असल्यामुळे त्याचा फक्त प्राथमिक गरजा भगत असे. या कारणामुळे तो नेहमी दुःखी असे. त्यास वाटे की आपल्याला ही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी. त्यासाठी तो सारखे म्हणत असे कि, ” मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईन. तो नेहमी यांसाठी देवाकडे मागणी करत असे. देवाने ही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले.

” एक दिवस तो सकाळी जागा झाला, तो समोर देवाचेच दर्शन झाले. त्याला खूप आनंद झाला, आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले, त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली कि देवा मला भरपूर जमीन मिळवून दे. देवाने सांगितले ” तू आता पळायला सुरवात कर सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारुन इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुझी होईल. असे बोलून देव अदृश्य झाले. शेतकऱ्यास खूप आनंद झाला.
त्याने देवाने सांगितल्या प्रमाणे धावण्यास सुरवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हती त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला. पण दिवसभरात अविरत धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता कि तिथे पोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला. ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाला,

” तो आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्याच जमिनीची त्याची वास्तविक गरज होती. अश्या प्रकारे शेतकरी ला जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने गेला. देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवीय का जमीन, तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करेन. आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईल. देव प्रसन्न होऊन अदृश्य झाला.

मराठी बोधकथा तात्पर्य : अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो. अथवा अति तेथे माती
                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- २८ चा पाढा

                                  २८           १६८
                                  ५६           १९६
                                  ८४           २२४
                                 ११२          २५२
                                 १४०          २८०

    ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

               📝 प्रश्नावली १८९ 📝



प्रश्न १. सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर :- malic ऍसिड

प्रश्न २.  चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :- टार्टारिक आम्ल

प्रश्न ३. दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर :-  लैक्टिक ऍसिड

प्रश्न ४. व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर :- ऍसिटिक ऍसिड

प्रश्न ५. लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल

प्रश्न ६. लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर :- सायट्रिक आम्ल

प्रश्न ७. टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर  :-ऑक्सॅलिक ऍसिड

प्रश्न ८. किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर :- कॅल्शियम ऑक्सलेट

प्रश्न ९. प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल

🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆

👉 आपल्या माहितीसाठी

महाराष्ट्र सरकारने 1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
◾️महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस ◾️
⭐️महाराष्ट्र दिन – 1 मे (1960)
⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना – 1 मे (1962)
⭐️हुतात्मा स्मृती दिवस – 21 नोव्हेंबर
⭐️बालिका दिवस –  3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
⭐️पत्रकार दिन – 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
⭐️राज्य क्रीडा दिन – 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस)
⭐️सिंचन दिवस – 26 फेब्रुवारी ( शंकराव चव्हाण स्मृती)
⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन – 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती)
⭐️उद्योग दिन महाराष्ट्र – 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन)
⭐️समता दिवस – 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन)
⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
⭐️ज्ञान दिवस -14 एप्रिल (डॉ बाबासाहेब जन्मदिवस)
⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे
⭐️शिवस्वराज्य दिन – 6 जून
⭐️सामाजिक न्याय दिन – 26 जून (शाहू महाराज जयंती)
⭐️कृषि दिन – 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती)
⭐️शेतकरी दिन – 29 ऑगस्ट 
⭐️रेशीम दिवस – 1 सप्टेंबर
⭐️श्रमप्रतिष्ठा दिन – 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती)
⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
⭐️ ज्येष्ठ नागरिक दिवस – 1 ऑक्टोबर
⭐️रंगभूमी दिवस – 5  नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती)
⭐️विद्यार्थी दिन – 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ)
⭐️जैवतंत्रज्ञान दिवस  – 14 नोव्हेंबर
⭐️हुंडाबंदी दिवस – 26 नोव्हेंबर

Share This Article